श्री सद्बागुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल, तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने तुम्ही शुद्ध ऐकाल, तुम्हाला शुद्धच ऐकू येईल. वृत्ती हीन असेल तर त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. शुद्ध विचार आले नाहीत तर आपल्यात शुध्दत्वता येणार नाही. शुध्दत्वता आली नाही तर आपण सताला पाहू शकणार नाही. म्हणूनच आपले मन कसे हवे, तर शुद्ध स्फटिकासारखे !
सताच्या प्रकाशाचा पडदा केव्हा फाकला जातो? तर आपल्या सत् शुध्द वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.
“सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.” सूक्ष्म म्हणजेच आपणांत असणारा तो सताचा अंश !
मनाला शुद्ध ठेवायचे असेल तर प्रथम पायरी वृत्ती शुद्ध ठेवली पाहिजे. वृत्ती शुद्ध असेल तरच त्रिकुटी स्थिर राहील. कितीही उच्च पदाची ज्योत असली, पण जर कां त्याची वृत्ती हीन असेल, तर त्याच्याकडून काहीही होणार, काहिही घडणार नाही.
ज्याची वृत्ती सत् शुद्ध आहे, त्याला जगात कोणीही बनविणार नाही. वृत्ती जर शुद्ध नसेल तर मन केव्हाही स्थिर राहणार नाही. मन स्थिर राहिले नाही, तर सत् कदापिही प्राप्त होणार नाही.(समाप्त) ©️
