Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

श्रीराम प्रभू ©️

श्रीराम प्रभू ©️

श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार नटवलेले तत्त्व (जो क्षिराब्धी तो) मीच आहे. मला जी कर्तव्य सांगितली, ती करीत करीत मी लयबद्ध झालो होतो. सताला पूर्णत्वाने संरक्षण देणे व असताचा नि:पात करणे, हिच भूमिका घेऊन सर्वस्वाला सांभाळीत ज्याच्यासाठी जन्म अवतार नटवला, त्या अघोरांचा मानवी कर्तव्याप्रमाणे नि:पात केला.

या भारत भूमीमध्ये माझा उत्सव मोठ्या आपुलकीने साजरा करत असतात. असे जरी असले तरी मला सुद्धा कोणी सूत्रधार आहे, हे मानवाने लक्षात ठेवावे. असे जे अनंत आहेत, त्यांच्या आदेशाशिवाय झाडाची पानेही हलत नाहीत. असे जे सूत्रधार ते आपले सूत्र अदृश्यपणे हलवित असतात. पण दृश्य तत्त्वाला त्याची जाण असावी लागते. त्याप्रमाणे मी माझे कर्तव्य सत या चाकोरीतूनच केले आहे असे मला वाटते. रथी महारथी या आसनाजवळ लयबद्ध आहेत. जसे अवतार कार्य, तसे या आसनावर प्रगटीकरण होत असते. या आसनाचा अंत ना पार असे हे आसन आहे. वशिष्ठ गुरुदेव हे माझे सद्गुरु आहेत. त्यांचेही सद्गुरु आहेत. असे हे आसन आहे. त्यांच्या संदेशाप्रमाणे आम्ही कर्तव्य परायणता साधतो. त्याच्याशिवाय कर्तव्य होत नाही. म्हणून जगात सत आहे. ©️

You cannot copy content of this page