अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात निमग्न असताना सुद्धा, त्यांना आपल्या कर्तव्यात निमग्न होऊ न देता, अघोर त्यांच्या कर्तव्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेला अवतार कार्य नटवावे लागते.
आत्ता असेच अवतार कार्य चालू आहे. याच शुभदिनी अवतार कार्य नटवून त्यांना मुक्त करण्यात आले. तो आजचा शुभदिन श्रेष्ठ दर्जाचा आहे. मानवाला ज्या वेळेला जन्माला घालण्यात येते, त्या वेळेला त्याचे कर्तव्य त्याच्याबरोबर देऊन टाकलेले असते. जन्माला आल्यानंतर त्याची प्रेरणा सत असते. पण तो असत का बनतो? तर षड्रिपूचे जे जाळे आहे, त्या जाळ्यात तो गुरुफटला जातो. त्याचा त्याला यत्किंचितही विचार नसतो. त्याला या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी हे अवतार कार्य आहे. त्याला यातून बाहेर काढल्यानंतर व सताची ओळख पटल्यानंतर, त्या सताला डोळे भरून पहाणे हे त्याचे कर्तव्य आहे. ©️
