Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

विचित्र विधान ©️

विचित्र विधान ©️

विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण || ज्या मानवाचे विचित्र विधान आहे, म्हणजे पूर्वीचे संचित विचित्र आहे, त्यांचे पूर्वीचे ऋण म्हणून सानिध्यात घेतले जाते. म्हणजे तो कासावीस झालेला असतो. विचित्र भोगत्वाचा त्रास होतो. संत संगतीने त्याचा थोडा थोडा क्षय होत असतो. विचित्र विधानाचे अनुसंधनाने काय करतात? ते संचित त्याला अनुसरून नाना खेळ खेळत असतात. जर मानवाने ओळखले तर तो भाग्यवान आहे. पण मनाची भावना आणखी ठिकाणी फिरत राहिली, तर संचित वाढते. गती मिळाली असताना सुद्धा, जर मनाची चलबिचल, अदलाबदलीची भावना वाढू लागली तर तत्त्वाचा अंत लागू शकतो का?

विचित्र विधान म्हणजे काय? त्या अनुसंधनाने समर्थ बाहुल्या नाचवतात, मग समर्थांचे चुकते का? त्याचे संचित, त्याप्रमाणे समर्थ खेळ खेळतात. एवढे खेळ खेळून, तो जर मार्गावर आला, तर समर्थांच्या चाकोरीत बसेल. त्याप्रमाणे त्याला सानिध्यात घेतले जाते, पण मी कोणीतरी विशेष आहे, असे समजून अहंकाराच्या आहारी गेला, तर त्याचे त्यालाच कळले नाही. म्हणून विचित्र संचित वाढले जाते. करतो त्यावेळी त्याला काही वाटत नाही, मग पुढे डोईजड होते. अशाला सुख समाधान लवकर मिळते का? सुख समाधान कशात आहे? याचा अनुभव सेवेकऱ्यांना मिळतो की नाही? ©️

You cannot copy content of this page