Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

पळवाट काढू नका…©️

पळवाट काढू नका…©️

सर्व ठिकाणी व्यापक, सर्व भूतेषु मी आहे, हे ज्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी कसा असेल? माझ्याशी कोण बोलतो त्याची तो विवंचना करील. जडत्व मानव बोलतो आहे का? कोण बोलतो आहे? सर्व व्यापक, सर्व भूतेषु मी आहे हे जर जाणले, तर त्या पात्रतेची उत्तरे तो देऊ शकतो.

मातीचे ढेकुळ पाण्यात विरघळते, त्याप्रमाणे सेवेकरी पाण्यासारखा कधी होईल? याची अपेक्षा करावी का? असा आदर्श सेवेकरी बनला, मग मात्र जो बीजदाता निर्माण करणारा, बीजात बीज उत्पन्न करणारा कोण त्याचा शोध घेईल. असा जर बीज निर्माण करणाऱ्याचा पाठलाग केला, तर तो सापडेल. पण कसा सापडेल? माझे तुझे केल्यावर सापडेल का? सेवेकर्‍यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे, हे जर ओळखले, तर कोणते प्रणव निघतील? कोण बोलतो आहे याचा विचार केला, तर त्या ठिकाणी कसे वागावे, याची खूणगाठ बांधावी, तरच बीजदाता हाताशी सापडेल. त्याची ओळख होईल. ओळख झाली नसती, तर तो या ठिकाणी रममाण झाला नसता. ओळखून सुद्धा पळवाट काढली, तर त्याचा अनुभव आपल्याला अवश्य मिळेल. अनुभव असून, ओळख असून, पळवाट काढली तर दोष कोणाचा? म्हणून पळवाट काढू नका.©️

You cannot copy content of this page