Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

माझे माझे …©️

माझे माझे …©️

एखादा महान भक्त किंवा सेवेकरी अह:र्निश सद्गुरु ध्यानात नामात तल्लीन असतात, रात्रंदिवस कष्ट केलेले असतात. थोडक्यात, शेवट शेवट मुक्ती मोक्ष मिळण्याचा संभव असतो. अशी वेळ जवळ आली असताना, त्याला कशी आशा सुटते? तो कोणत्या रस्त्याने जातो? तर त्याला मायेची आशा लागते. थोडासा सताचा विसर पडल्यानंतर हे माझे, ही माझी जमीन, माझा पैसा सर्व माझे माझे म्हणतो. मग मुक्ती आणि मोक्ष सानिध्यात येईल का? असा सेवेकरी असल्यानंतर, त्याने माझे माझे म्हटल्यानंतर त्याला सताच्या नामाचा विसर पडतो. मायेच्या आधीन झाल्यानंतर तो बध्द होतो, म्हणजे सतापासून दूर जातो. मायेच्या कक्षेत पूर्ण सापडल्यानंतर तो बद्ध झाला. सत सानिध्यात असताना त्याचा आवाज खणखणीत असतो. मायेच्या कक्षेत गेल्यानंतर बद्ध होतो. म्हणजे प्रकाश, श्रवणी बंद होते. मग त्याला काहीच करता येत नाही. त्याला कोणाचे ध्यान करतो याचे भान राहत नाही. बद्ध झाला नसता, तर सर्वस्व चालू राहिले असते. बद्ध झाल्यानंतर प्रकाश, श्रवणी यांची कसलीच गती नाही. कारण माझे माझे म्हणणे ! ©️

You cannot copy content of this page