Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

आकारीले तितुके नासे | ©️

आकारीले तितुके नासे | ©️

श्री समर्थ मालिक – बालक आईला सोडून दूर गेल्यानंतर त्या बालकाला किंवा आईला मनापासून समाधान असते का? ती आठवण, दिवस लोटल्यावर बुजत बुजत जाते. त्याचप्रमाणे हे आहे.

आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी || आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? तर नाशिवंत !

जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो, म्हणजे आकार दृष्य झाला असे वाटते, तर तो कोणाला अन् नाही कोणाला? स्थानवंत आहे, त्या अर्थी आकारी आहे. आकारी असून निराकारी आहे. त्याचा ठावठिकाणा नाही.

आत्तापर्यंत प्रवचने होत आली ती का अन् कशासाठी, हे येथील सेवेकऱ्यांना माहित असेलच. ही प्रवचने कडक का झाली? सेवेकरी चुकले म्हणून नां? मग झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे. मी कोणीही नाही, मी निमित्त मात्र आहे.

सेवेकरी बोलतो आणि फसतो. सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे. मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? हे प्रथम शोधले पाहिजे. मन सर्वांगीण शुद्ध ठेवले पाहिजे.

मायेचे सुद्धा बोल बाहेर पडतात. जर मायेच्या आधीन झाला तर त्याचप्रमाणे त्याला मालीक वाटचाल करावयास लावतात, पण माया अंत लागू देईल का? सेवेकरी मायेच्या आधीन गेला तर माया फसवणारच. पण मायेच्या आधीन गेला नाही तर माया फसवणार नाही. मायेच्या रहित कोणीही नाही. पण त्याला मर्यादा आहे. मर्यादशील मायेला ठेवलीच पाहिजे. नाहीपेक्षा माया कोठे चढवील आणि कोठे पाडील याचा अंत नाही. सेवेकऱ्यास वाटत असेल की माझे सताचेच बोल आहेत, पण नाही. याचे शोधन सेवेकर्‍यांने करावयास हवे. हे बोल कोणाचे आहेत, यात चिकिस्तक राहिले पाहिजे. माझ्या सद्गुरूंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहील तर सत् त्याच्यापासून दूर नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page