Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अखंड सेवा ©️

अखंड सेवा ©️

अखंड सेवा – अखंड सेवा ही दिलेलीच असते. परत मागण्याची जरुरी नसते. ती दिलेली असते. सेवेकऱ्यांना ती टिकविता येत नाही, म्हणून त्यांना असे वाटते आणि जरी नसेल, तरी मालिक, सद्गुरु हे देतातच. दिलेल्या प्रमाणे सेवेकऱ्याने ती सेवा टिकविली पाहिजे. अखंड सेवा दिली आहे, पण त्या अखंडत्वाचा उपभोग घेता आला पाहिजे. ज्याला कधीही खंड नाही, असे ते अखंड सेवेकऱ्याला दिलेलेच असते. त्या सेवेत खंड आहे का?

भक्ती करणे हा मानवाचा हक्क आहे, अधिकार आहे. तो कुणीही हिरावून घेत नाही. घेतला जाणार नाही. पण भक्ती म्हणजे काय? हे अजून काही मानवांना समजले नाही. काही मानव हे अद्वैताच्या मागे आहेत. काही द्वैताच्या मागे आहेत, त्यांना सत मार्ग सापडणार नाही. आपल्याला जे अखंड भक्तीचे वळण दिले आहे, ते सत् आहे. तेच अद्वैत आहे. तिच अखंड सेवा आहे. तिच सत् तिजोरी आहे. सेवेकऱ्यांनी त्याचा उजाळा करणे. ती तिजोरी कधी काठोकाठ भरेल, याचीच सेवेकर्‍यांनी अपेक्षा करणे. ©️

You cannot copy content of this page