स्वधर्म म्हणजे काय? अन् परधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे तो सतपूर्ण आहे, ज्याच्या मुखावर सताची झलक असते, ज्याची सतकृती आहे, सतभक्तीत रममाण आहे, तोच खरा तो धर्म होय. असा भक्त भिक्षांदेही नसतो. त्याची इच्छा पूर्ण होते. तो स्वयं तत्त्वावर अवलंबून असतो. जो सतमार्गाने, सतधर्माने जातो, त्याला दुसरीकडे भिक्षा मागण्याची जरुरी नसते.
पर म्हणजे अंधार, अहंकाराने बरबटलेली कृती ! परधर्म म्हणजे काय? येथे पर कां म्हटले आहे? म्हणून पर म्हणजे चमत्कार, नमस्कार, ऋध्दी-सिध्दी, तंत्र -मंत्र हे आहे. याच्या आधिन बनल्यानंतर, तो परक्यावरच अवलंबून असतो. अशा मानवाला स्वयम् म्हणता येईल का? तो काय म्हणतो, मीच सर्वस्व आहे. कारण त्याच्याजवळ ऋध्दीसिध्दीचे गाठोडे असते. त्याचा अहंकार वाढत जातो. अहंकार वाढल्यानंतर, मी कोणीतरी विशेष आहे, अशी त्याची भावना होते. त्यांचे हे गाठोडे काढून घेतले तर काय होईल?
तंत्र-मंत्र कोणाच्या आधिन आहेत? याला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे ना? पर म्हणजेच या प्रपंचात अघोर भक्तीने बरबटून ऋध्दीसिध्दीचे आधिन गेलेली अहंकारयुक्त ज्योत ! अशा रीतीने अहंकार वाढल्यानंतर त्याला सुख सापडत नाही. त्याला वाटते मीच हे सर्वस्व करतो. पण स्वयम् जे आहे, ते असे म्हणणार नाही. मी करतो, त्याची त्याला गती असते, जाणीव असते. करणारा मी कोणीही नाही. मी निमित्तमात्र आहे. स्वयम् तत्वाच्या पाठीमागे जाणारा, तो केव्हांही प्रसंगात पडणार नाही, पडू देणार नाहीत. इतकेच, त्याची त्याला जाणीव देत नाहीत, गती देत नाहीत. स्वयमेव तत्व त्याला त्रासातून मुक्त करते. पुढे सुरु….२ ©️