Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

माणिक-मोती ©️

माणिक-मोती ©️

(१)  मालकांचे बोल – आसनावर असलेले तुलसीपत्र सेवेकऱ्यांशिवाय इतरांना घेण्याचा अधिकार नाही. जे भावी सेवेकरी आहेत, त्यांनी आसनाधिस्ताना विचारुन व त्यांनी परवानगी दिली तरच तुलसी पत्र घेणे.

उदाहरणार्थ – एका घरात दोन ज्योती आहेत – एक अनुग्रहित व एक नाही. ती भावी सेवेकरी मानली जाते. ती ज्योत त्या ज्योतीवर (सेवेकऱ्यावर) अवलंबून असते, अशी ज्योत आसनाधिस्ताना विचारुन तुलसीपत्र घेवू शकते. 

(२)  आसन दृश्य आहे, त्याप्रमाणे अदृश्यपण आहे. सेवेकऱ्याना व इतर ज्योतीना नम्रपणे सांगणे आहे की, इतर ज्योतींच्या मनात शंका येईल असे काहीही करु नका. ते शंका धरोत की न धरोत, विचार करोत अगर न करोत, संशय रहित व्हा, शुद्ध शूचि:र्भूत व्हा असा आदेश आहे.

(३)  सर्वस्व शुद्धीकरण झाल्यावर मानवांचे शुद्धीकरण करावयाचे आहे. बाहेरचे व दरबाराचे जे मानव शुद्ध सत आहेत, मानवांसाठी झगडणारे आहेत, त्यांना ठेवणार आहे, दुसऱ्याचे वाईट पाहतात, दुसऱ्याचे वाईट इच्छितात, त्यांना ठेवणार नाही. 

(४)  समर्थ आदेश – आपल्या दरबारात सेवेकरी होतील, होणार आहेत, त्यांची पूर्ण पाहणी छाननी करून घ्यावी. ती घेतल्याशिवाय अनुग्रह नाही. या आदेशाचे कारण, अशा मानवांना अनुग्रह देण्यात अर्थ नाही, कारण दुसऱ्याच्या उचापती करीत राहण्याऱ्या मानवांचा काहीं अर्थ नाहीं. 

(५)  संत तुकाराम महाराज म्हणतात, “आताचे सेवेकरी आम्हांसारखा त्रास सहन करणार नाहीत. ज्ञानोबा सारखे त्रास सहनशीलता राखणे सुध्दा हल्लीच्या संतांच्या अंगी नसते. 

(६)  भक्ती रूपाने माऊली आपोआप सहनशीलतेचा मार्ग दाखवते. समर्थ माऊली रंग ढंग करीत नसते. तसे जर केले तर भक्ताला एक पाऊल सुध्दा पुढे टाकता येणार नाही. मानवी सेवेकऱ्याने कसे राहिले पाहिजे? 

(७)  आतापर्यंत संत मानवांचे किर्तन रूपी, प्रवचन रुपी, मन शुद्घ करीत आले. परंतु मानवांनी काय घेतले? ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page