ज्या समर्थांनी जे तत्व सर्वांठायी विखुरलेले आहे, सर्वांठायी व्याप्त करुन ठेवलेले आहे, फेकले आहे ते नसल्यावर तू कोणाची भक्ती करणार? आणि कशी करशील? मग मी भक्ती करतो ह्याला आधार काय? कसे म्हणशील? तर सत् मार्गाला लावणारी, बुध्दीला चेतना देणारी, प्रकृतीला चेतना देणारी, सर्वस्वाला चेतना देणारी व्यक्ती एकच आणि तीच सर्व ठिकाणी व्यापक होय. ती जर नसेल, तर मग या जड देहाचा काहीच उपयोग नाही. याचा एकाही मानवाने विचार केलेला नाही. म्हणून ईश्वराच्या नावाने रात्रंदिवस टाहो फोडता पण त्याला काहीच अर्थ नाही. नुसता टाहो फोडल्याने, मोठ मोठ्याने ओरडल्याने त्या समर्थांचे दर्शन होईल असे केव्हाही शक्य नाही. पण त्या ओरडण्याची, हाक मारण्याची शिस्त फार वेगळी आहे. याचा रस्ता, ज्या ठिकाणावर आपण शरण आहोत, त्यानाच मनःपूर्वक आळवळे पाहिजे. म्हणजे सर्वस्वाची जाणीव मिळेल. मोठ्याने ओरडण्यात, टाहो फोडण्यात अर्थ काय? जवळ सानिध्यात असताना जाणीव मिळवू शकत नाही, मग भक्ती करतो याचा अर्थ काय?
काही पूर्वापार, काहीं योनी भटकत आलेल्या ज्योतीत, जसजसे प्रकृतीला वळण, त्याच तऱ्हेचे वळण लागले जाते. त्याच तऱ्हेने कार्य करून घेतले जाते. ज्या प्रकृतीला सत वळण लागेल, त्याच्या कडून सतच कार्य करून घेतले जाते. जिला असत आणि वाईट व्यसनांचा सराव लागलेला असतो, त्याच्या कडून त्याच तऱ्हेचे कार्य होणार. त्याला चांगले आवडणार नाही. तो मुळातच अद्वैत असतो. परंतु अद्वैतच द्वैत बनतो. जो खरा सेवेकरी भक्तीत निमग्न असतो, तो कोणत्याही विषयांवर हेतू ठेवीत नाही. काहींना कितीही सांगितले, कितीही ज्ञानामृत पाजले, तरी तो म्हणतोच, जो हेतू होता, तो विचारावयाचा राहिलाच. अशाना काय म्हणावे हेच कळत नाही. याच्या पलीकडे काय सांगू? ©️