Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

गुरुपद आणि कालचक्र ©️

गुरुपद आणि कालचक्र ©️

श्री समर्थ मालिक – प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्यांच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत, ते श्रेष्ठ आहेत. हे नाते अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात.

सद्गुरूंच्या मुखातून मिळालेले अमृततुल्य प्रणव जतन करणे हे सेवेकऱ्यांचे महान पवित्र कर्तव्य आहे. कालांतरापासून सेवेकरी आणि सदगुरू, गुरु आणि शिष्य हे नाते फार श्रेष्ठ आहे, अखंड आहे. आपल्या सेवेकऱ्याला शुद्धीवर आणण्यासाठी ते लाघव करतील, नाना तऱ्हा करतील, वेळेला शिक्षाही करतील. पण ते दूर फेकणार नाहीत हे सेवेकर्‍यांनी ध्यानात ठेवावे.

हे आसन बघितले तर काही दिसणार नाही. प्रकाशमान सेवेकऱ्यांनी चाचपून बघावे. कोणत्या तर्‍हेचे आहे? याची पूर्णत्वाने छाननी करावी. अनेक वेळेला ऐकले ते सेवेकऱ्यांच्या हृदयी बिंबले पाहिजे. पूर्णत्वाने समजले पाहिजे, तरच त्याला महत्त्व आहे. मानवांना, सेवेकऱ्यांना गती जरी आहे, तरी त्यांची इच्छा होते. मालिक प्रत्येक वेळेला संदेश देतात. वर्ष येते आणि जाते. पण त्याला अंत नाही. जो संदेश दिला, त्यात मागे पुढे होणार नाही. असत होणार नाही. पण काही काळ, अन्यत्र कारणांमुळे मागे-पुढे होत असते. कारण जगाची रचना निराळी आहे. कालचक्र हे सारखे फिरत असते. देवाण-घेवाण ही चालू असते. तरीपण कालचक्र हे थोड्या कारणाने मागे-पुढे होते. जे घडणार आहे ते घडणारच ! याबाबतीत थोड्याच अवधीत आपणाला संदेश मिळतील. कालचक्र हे फार निराळे आहे. ©️

You cannot copy content of this page