Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

तर सद्गुरु चरण प्राप्त होणार नाहीत…©️

तर सद्गुरु चरण प्राप्त होणार नाहीत…©️

श्री समर्थ मालिक – 

महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या आहेत हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे. सेवेकऱ्यांनी मनाने सत् शुद्ध होण्याचा प्रयत्न करावा. एवढे तरी करा. याच जन्मी कमवायचे असेल तर आत्ताच कमवून घ्या. भंडार भरलेला आहे पण लुटणारा पाहिजे, नाही पेक्षा त्याचा उपयोग काही नाही, लाभ तर दूरच राहिला.

संचिताची घडण ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे सेवेकर्‍यांना माया मिळते. हे जरी असले तरीपण ज्यांच्या संचितात नाही, परंतु ते सताचे निस्सीम भक्त आहेत, त्या सेवेकऱ्यांना केव्हाही उपाशी ठेवणार नाही. मायेला निर्माण करणारा तुमच्या सानिध्यात आहे, तर मग माया काय करणार?

माया म्हणजे काय? माया कोठे जाणार आहे? इतकेच आहे, बऱ्याच वर्षापासून दरबारच्या सेवेकऱ्यांना संदेश आहेत – एकाच जीवात, एकाच प्रेम रज्जूत आपण डूंबून रहावे ही समर्थांची अपेक्षा असते. हेवे-दावे, मनाचा कलुषितपणा, कुणालाही नाराज न करणे व आपली कृती तशी ठेवणे हे आपले कर्तव्य नाही. माझा कोणताही गुरुबंधू भगिनी नाराज होऊ नये अशीच मनाची धारणा प्रत्येक सेवेकर्‍यांने ठेवली पाहिजे. आपले मन शुद्ध स्फटिका सारखे ठेवले पाहिजे तरच आत्ताच्या महान कर्तव्याला शोभा येईल. मनामध्ये गढूळपणा ठेवल्याने शोभा येणार नाही, सद्गुरु चरण प्राप्त होणार नाहीत. ©️

You cannot copy content of this page