Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत हे तरुन निघणार ©️

सत हे तरुन निघणार ©️

श्री समर्थ मालिक – आचार विचार सोडलेल्या मानवांसाठी पूर्ण विचार करावा लागतो. भरपाई झाल्याशिवाय हात घालता येत नाही. एकच, भक्तगणांनी धीर सोडू नये. आज कालचा हा काळ नाही. पूर्वीपासून हे चालत आलेले आहे. सत भक्ताला असताचा त्रास होतो. सेवेकर्‍यांनी त्यातून तापून कसून निघाल्यानंतर पूर्ण प्रकाशित होतो. पण त्याला कळत नाही. मातलेले अघोर त्या ठिकाणी शरण जातात.

घरातल्याला अनुभव देऊन सुद्धा त्याने काय धन लावली आहे? घरातल्या ज्योती मुळेच इतरांचा बडेजाव चालला आहे. त्याने जर त्यांच्यावर थोडासा जरी मग्रुरीपणा केला, तर त्या मानवांची टाप चालणार नाही. पण घरातल्याचे लक्ष आसनाच्या मिळकतीवर होते. ती लाटायचा विचार चालला होता. त्यावर संसार चालवायचा होता. पण अधिकारी तत्व ते चालू देणार नाही. प्रथमच मी संदेश दिले होते कि ही ज्योत दूर ठेवा, पण आपण म्हटले होते की, आपली ज्योत आहे. जेवण खानं मिळावयास पाहिजे.

त्या ज्योतीला थोडेसे सानिध्य मिळाले आहे. दिलेले आहे. मायावीने या ज्योतीला पाहिले तर आप मतलबी ज्योत आहे. तो मतलब आपण साधू देत नाही. त्याला अनुभव दिला त्याची आठवण नाही. त्याला एखाद्या दिवशी चांगलीच आठवण देणार आहे. थोडक्या दिवसातच आठवण मिळेल. काळ अगदी नजीक आला आहे. मी करूनही अकर्ता असलो तरी त्यात अनेक विचार आहेत. याच्यासाठी अनेक सात्विकांना झळ लागणार आहे. म्हणून विचार पडतो. इतकेच काय, खाण्यापिण्याची मोताद झाल्यावर हा काय करणार आहे? त्याच्यासाठी विचार पडतो. जे घडवायचे ते घडवून घेणारच आहे. सत हे तरुन निघणार. त्याच्यासाठी काहीतरी करावे लागते. आत्ताच संदेश दिले, झळ लागेल. ती सहन करा. वेळेच्या अभावी कोणावरही दया करता येणार नाही. मग कोणीही असो, सत् हे आपोआप तरुन निघणार. आपण काही चिंता करू नये. ©️

You cannot copy content of this page