Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत आसन दिशा ©️

सत आसन दिशा ©️

नर्मदा निवासी: मग आताचे मानव! ते मानवच आहेत ना?

सद्गुरु बाबा : पण ही चौकट त्यावेळी होती ना?

नर्मदा निवासी : आम्ही हे प्रश्न का विचारले? पूर्वी हे आसन पूर्व पश्चिम अन आता दक्षिणोत्तर आहे. त्याच काळात चौकटाने कुरघोडी केली. त्यावेळी बहुतेक मानव अहंकारी नव्हते. या काळात एकही मानव असा सापडणार नाही की त्याच्याजवळ अहंकार नाही. या सर्वस्वाची  परिपूर्ण माहिती आहे. आपण प्रत्येक वेळी प्रश्न विचारीत होता आम्हाला नाही, त्या तत्त्वाबरोबर झगडत होता. आपण अनुग्रह दिला तो असा का? त्याचे स्पष्टीकरण करणे. या चौकटाने इतका धुमाकूळ घातला की आम्ही देखील याच परिस्थितीत होतो. तेथून येऊन आम्हीच अनुग्रह दिला.”

सद्गुरु बाबा : आपण मालिक फक्त आमच्या गालाला हात लावला होता.

नर्मदा निवासी : आम्हास कल्पना आहे कोणास कसा अनुग्रह द्यावा. आपली थोडी का परीक्षा घेतली? त्यातून उत्तीर्ण झालात म्हणून एवढी कर्तव्ये झाली. आपल्या प्रमाणे आणखी काही ज्योतींना अनुग्रह दिला. त्यांच्याकडून एवढी कर्तव्ये झाली नाहीत, म्हणून आता त्यांचा शेवट झाला. म्हणूनच आम्ही प्रणव दिला. सेवेकरी अन सद्गुरु! पितामह गुरुदेव, त्रिगुण होते. मग प्रकट का होत नव्हते? प्रथम आपले आदेश आले त्याचवेळी प्रगट झालो व प्रथम येथे आलो ना? ©️

You cannot copy content of this page