श्री समर्थ मालिक – सर्व समर्थमय करावयाचे असेल तर संसार नेटका केलाच पाहिजे. ज्याचा संसार नेटका नाही, ती ज्योत गतीमान होणारं नाही. शांती मिळणार नाही. माया आणि ज्योत यामध्ये संघर्षात जी ज्योत आहे, ती स्थिर होऊ शकते. मायेला स्थिर करीत नाही, तोपर्यंत स्थिर होईल कसा?
जोपर्यंत सत् ओळखले नाही, तोपर्यंत सत् नाही. म्हणून सताचे आदेश मानणे हे कर्तव्य आहे. जोपर्यंत मानीत नाही, तोपर्यंत काही नाही.
या दरबारात ज्यांना ज्यांना अखंड नामाची गती दिली, ते सुद्धा म्हणतात, बाबा हे बघा, ते बघा. अजून मायेत आहेत. पण त्या सेवेकर्याला कळले असते तर? कळले म्हणावे तर सेवेकऱ्याने कुटुंबाला का शांती देऊ नये? एवढा अधिकार दिला आहे. ते म्हणतात, तुम्ही हात फिरवा. मग ज्याचा त्यानेच हात फिरवावा. ते करून पहा. हे करायचे सोडून, तुम्ही करा, तुम्ही बघा. म्हणून जेवढे तुम्ही आचरणात आणाल, एवढा तुम्हाला फायदा होईल. सर्वांनी आपल्या कर्तव्यात रहा हे संदेश आहेत. (समाप्त) ©️
