Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मी पाप पुण्या निराळा ! सुखदुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?©️

मी पाप पुण्या निराळा ! सुखदुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?©️

श्री नर्मदा निवासी मालिक – कर्तुम अकर्तुम जी शक्ती आहे, त्यांच्या भक्तांना व्याप होतात. त्याची पाहणी करणे कर्तव्य आहे. आकाराला चेतना देऊन निराकारी पदाने व्यवहार करणारी जी शक्ती आहे, ती लाघवाने खेळ खेळते. कृष्णावतार त्यांनी नटविला हे मला मान्य आहे. त्यावेळी पार्थाला सांगितले, “मी पाप पुण्या निराळा ! सुखदुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?” असे जे म्हटले होते, ते कृष्ण म्हणत नव्हता. कृष्ण हे ॐकार स्वरूप आकारी होते. पण आकार बोलत होता. तो कशाच्या आधारावर? तो आकार कृष्ण समान झाला होता म्हणून प्रणव बाहेर पडत होते. करणारे तेच आणि निवारण करणारेही तेच आहेत. लाघवी तऱ्हेने खेळ खेळणारेही तेच आहेत. कोणत्या भक्ताला मोकळे सोडले आहे? चुकूनही नाही.

रामावतारात १४ वर्षे वनवास काढण्याची काय आवश्यकता होती? कृष्णावतारात ज्याप्रमाणे मानवी बुद्धी फिरत होती, त्याप्रमाणे वळसा घालून हे कर्तव्य करावे लागले. सतासाठी उलटे सुलटे करावे लागले. मानव कृष्णावताराला चांगले म्हणतात ते का? ज्यावेळी वाली सुग्रीव यांचे युद्ध झाले, त्या वेळेला सुग्रीवाला मारण्याची आवश्यकता काय होती? पण त्यामध्ये मुख्य मुद्दा काय आहे हे मानव बघत नाहीत. ते घेत नाहीत. ©️

You cannot copy content of this page