Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

प्रवचने कशासाठी…©️

प्रवचने कशासाठी…©️

श्री समर्थ मालिक – प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्‍यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. लाघव करण्याचे कर्तव्य मी मायेकडून करून घेतो.

मी करूनही अकर्ता, सुखदुःखाच्या वेगळा आहे, वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्व व्यापक असूनही अलिप्त आहे. पण सेवेकरी सताच्या आधीन न बनता, मायेच्या आधीन बनण्याचा प्रयत्न करतो म्हणून माया त्याला सोडत नाही. यामुळे सेवेकरी फसला जातो. म्हणून त्याच्यावर थोडी तिरकी नजर करावी लागते. मग मात्र सेवेकरी गयावया करीत असतो.

तरी चुकू नका ! अजूनही संदेश देत आहेत. एकमेकांची मने कलुषित करण्यासारखे काही करू नका. सेवेकरी आपुलकीच्या प्रेमात गटांगळ्या खाऊ लागला तर मला लाघव करावयास वाव मिळेल का? एकमेकांनी प्रेमाने वागावे.

आपली आपण शिस्त ही ठेवलीच पाहिजे. शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. शिस्तीचा भंग करू नका. बोल टाकताना विचार करून टाका. जरी टाकले तरी विचारांती टाका. आपुलकी निर्माण होण्याचा संभव असेल तर टाका. तामसी वृत्तीने टाकलेत तर सेवेकरी नाराज होतो. आता येथून पुढे तरी असे करू नका.

आसनाधिस्त नसताना कोणी कोणास बोलू नये. नाराजी सोडून द्या. एकाच प्रेमाने, समतेने सेवेकरी राहिला तर सेवेकर्‍यांची वागणूक पाहून मला सुद्धा प्रेम निर्माण होईल. प्रेम आणि प्रेम रस कसा पाहिजे? तर गोड अमृताप्रमाणे पाहिजे. अमृता समान असेल तर सेवेकर्‍याच्या मनावर त्याचा परिणाम होईल का? अमृताप्रमाणे प्रेम रस वाढला तर तो खाऊ शकेल की नाही. तेव्हा याप्रमाणे वर्तणूक ठेवा. हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page