Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

प्रकृती ही भिन्न आहे…©️

प्रकृती ही भिन्न आहे…©️

श्री विठ्ठल – हजारो तत्वे भूतलावर आहेत. त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही कोणीतरी विशेष आहोत असे आम्हाला वाटले होते. गुरु हे तेच सद्गुरु, तेच गुरुपद नटवू शकते. तेच निराकार पण होऊ शकते.

सगुण घडवले कोणी? प्रकृती घडवली कोणी? तेच आकारी, तेच ओंकार स्वरूप म्हणून गुरु चरण हे श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत, शुद्ध स्फटिकासारखे आहेत. त्या ठिकाणी मी-तू, शुद्ध-अशुद्ध असे काही नाही अन त्याच ठिकाणी सेवेकऱ्यांच्या मनाची नम्रता, लिनता पाहिजे, मानवांची सोडून द्या.

अनेक मानवांच्या अंगी काय गुण आहेत? त्यांच्या ठिकाणी भिन्नता आहे, त्यामुळे त्यांना कळत नाही, म्हणजे गुरु चरण पाहता येत नाहीत, समजत नाही, अन जर समजले तर, जगात भिन्नता काही नाही. मग मी, तू निर्माण झाले नसते. प्रकृती ही भिन्न आहे म्हणून भांड आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, म्हणून जो सतशुद्ध मार्गाने जाईल त्यालाच सद्गुरु चरण पाहता येतील, अंत घेता येईल. अन तेथूनच त्याला वाटचाल करता येईल. ©️

You cannot copy content of this page