Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

नामस्मरण घेण्यास काही हरकत नाही. ©️

नामस्मरण घेण्यास काही हरकत नाही. ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकर्‍यावर अवकृपा केली तर तो नामशेष होतो. मुख्य मुद्दा त्याला मार्गावर आणण्यासाठी थोडेसे करावे लागते. संचिताचा जो भाग, जे भोगायचे ते भोगलेच पाहिजे. ते कोणालाही सुटणार नाही. एवढे सत्य आहे, की तो भोग सेवेकऱ्याला तितकासा तापदायक होऊ देत नाहीत.

सेवेकऱ्याची मनोकामना अशी असते की सद्गुरु सेवेकरी आहे, मग मला हा त्रास का? परंतु सेवेकऱ्याचे जे पूर्वजन्मीचे देणे घेणे, ते फेडल्याशिवाय तो मोकळा होत नाही. सत सेवेकरी व्हावयाचे असेल, तर पूर्वजन्मीचे देणे घेणे सर्वस्व द्यावयास पाहिजे.

कितीही संकटे आली तरी सद्गुरु, सेवेकर्‍याचा थोडासा भाग आपल्या शिरावर घेतात. सेवेकऱ्याला जाणीव होण्यासाठी थोडासा त्रास होतो. मानवाला संदेश दिलेले आहेत. तुझी सर्वस्व कर्तव्य पूर्ण कर अन जो वेळ मिळेल तो सत्कारणी लाव. सर्वांनाच मायेचे वेष्टन आहे. ते कोणालाही सुटलेले नाही.

अखंड नामस्मरणात सतत असेल तर प्रारब्धाचा क्षय होतो. नामस्मरण करण्यासाठी बैठकच मारावयास नको. सहज ध्यान केले तरी चालते. संकटात नामस्मरण फार फार करायचे असेल, तर सुरुवात तरी थोडेसे कर हे संदेश आहेत.

सेवेकऱ्याला त्याचप्रमाणे प्रकाशमान सेवेकऱ्याला सर्व करायला वेळ असतो, पण दोन अक्षरी नाम घेण्यास वेळ नाही. त्याला काही नको, फक्त मनाची शुद्धता पाहिजे. सत शुद्ध गतीने मनात अभिलाषा न धरता, जाता येता नाम घेतले तरी पुष्कळ आहे. गंध नको, फुले नको, अक्षता नको काही नको. अगदीच वेळ नसला तर संध्याकाळी थोडे तरी कर. मंत्र तंत्र काही नको. फक्त दोनच अक्षरे! माळ जपण्याची जरुरी नाही. झाले किती याचेही माप नको. करायचे ते शुद्ध गतीने कर. मी त्याची नोंद घेत असतो. एकच संदेश, कितीही दूखत असले, तरी मुखातून सारखे नामस्मरण घेण्यास काही हरकत नाही. ©️

You cannot copy content of this page