Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

तर कोण कोणाची विटंबना करेल काय? ©️

तर कोण कोणाची विटंबना करेल काय? ©️

श्री समर्थ मालिक – बोलताना सेवेकरी बोलतो, “असे वाटते” अन् यावर चर्चा चालते. एकाने एकपट बोलले, तर दुसरा दसपट बोलतो. काही सेवेकरी अहंकारी आहेत.

अहंकार शुद्ध सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करा.

सेवेकऱ्यांने असे म्हटले पाहिजे, मी तुझा आहे, तू माझा आहे. आपला जन्मदाता एकच आहे. याप्रमाणे चला म्हणजे वाद निर्माण होणार नाहीत. याप्रमाणे वाटचाल करा. मग शांती सुख लवकर सापडेल. मोक्षाची वाट अलीकडे येईल. मग माया इकडे तिकडे हलू शकणार नाही. पण हे केव्हा अन् कधी होईल, तर सद्गुरु नामात तल्लीन होण्याचा प्रयत्न केला तर होईल. तरंग आले तर आठवण करा. मी कोणाशी वादविवाद करतो, कोणाची मस्करी करतो, सेवेकर्‍यांनी हे विसरून जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपुलकी लवकर निर्माण होईल.

आसनाधिस्तांनी कोडकौतुकाने सांगितले आहे. सर्व माझेच आहेत आणि मी सर्वांचा आहे. अशा तऱ्हेने कर्तव्य केले, तर कोण कोणाची विटंबना करेल काय? म्हणून मन मिळावूपणाने सेवेकऱ्याने वागावे. मन स्फटिका सारखे ठेवणे म्हणजे त्या ठिकाणी द्वैत भावना निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने वाटचाल करणे. 

आज पर्यंत काही सेवेकऱ्यांची मनमिळाऊपणे वाटचाल झालेली आहे. सेवेकऱ्यांचा प्रश्न आहे, मग कर्तव्य सेवेकऱ्याचे असो अगर त्याच्या मुलाचे असो, मायावी तऱ्हेने सेवेकऱ्याने जे कर्तव्य करावयाचे असते, ते करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही सेवेकऱ्यांनी वाईट वाटून घेऊ नये.

मात्र इतकेच आहे, दरबारातील सेवेकरी कोणीतरी जाणारच ! हजर राहणारच ! त्यातच त्याने समाधान मानावे. प्रत्येक सेवेकर्‍याच्या कर्तव्याला सर्वच सेवेकरी हजर होतील असे काही सांगता येत नाही. सेवेकऱ्यांपैकी कोणीतरी ज्यांना सवड असेल, त्यांनी हजर राहण्याचा प्रयत्न करा. कर्तव्याला जागृत राहणे हे संदेश आहेत. कर्तव्य काय आणि कोणते? तर या जन्मी ‌ काय केले पाहिजे, याची शोधन आपणच केले पाहिजे. सत करायचे ते याच जन्मी करा. म्हणून जे करावयाचे ते आत्ताच करा. आचरणात आणा. जे सांगितले ते बोल लक्षात ठेवून सारखे गिरवीत राहणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page