Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते…©️

तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते…©️

श्री समर्थ मालिक – अतिशय त्रास होऊ लागला तर त्या ठिकाणी तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते व थोडीशी माघार घ्यावी लागते. परंतु भक्तगणांना जर कां त्रास पडला, तर तो वैतागला जातो.

कर्तव्य करतो म्हणून संदेश दिलेले आहेत. कर्तव्य अस्त्राकडून करून घेवोत अथवा जातीने करून घेवोत हे विचारावयाचे नाही. कर्तव्य पाहण्यात, अनुभवण्यात आल्याशिवाय कर्तव्य चालू झाले आहे असे म्हणता येणार नाही. पाहू, कर्तव्याची दिशा किंवा कसे होते ते? घर्षण झालेले आहे. याबद्दल त्यांना टोचले आहे. तदनंतरच कर्तव्याची दिशा लवकर अंमलात आणतील असे वाटते. त्यांना ते कर्तव्य करणे भाग पडेल. त्यांचा रोख काय आहे?

७२-७३ त्या काळात जमीन अस्मानाचे अंतर आहे. काही लाटा येणार आहेत. त्या लाटेत काय होईल हे सांगता येणार नाही. या लाटा त्यांच्या संदेशाने सुटणार आहेत म्हणून सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीत मानव फार चिरडले गेले आहेत, जाणार आहेत, तरी सर्वांनी आपल्या आद्य कर्तव्यात राहणे अर्थात नामस्मरणात राहणे हे संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page