Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही,…©️

जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही,…©️

श्री समर्थ मालिक – यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल. मी सर्व भूतेषु पश्य असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात असेल.

प्रकृती स्वयमेव आहे, प्रकृती जन्म धारण करते असे आढळले आहे का? मग अनंत रूपे, अनंत नामे असे जे म्हटले आहे, ते कोण नटले आहे? मला नाही चरण, नाही नाक, कान, नाही डोळे, नाही तोंड पण बोलतो. फार सुंदर पाय नाहीत, पण चालतो. मी सर्वव्यापी आहे.

स्थूल देही आहेत, त्या स्थूलाचे व्यवहार कोणाच्या सत्तेने चालतात? जर सद्गुरु कृपेने सर्व चालते, मग तुझे माझे का होते? म्हणून जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही, तोपर्यंत सद्गुरु चरण तीर्थ प्रगटणार नाही.

सेवेकरी म्हणतात, ही प्रकृती आहे, पण ती कोणाच्या आधीन आहे? ती कोणाच्या स्वाधीन आहे? ती प्रकृती केव्हा फेकून देतील याचा थांगपत्ताही लागू देणार नाहीत. ते बाहेर केव्हा पडतील, हे कुणीही सांगू शकत नाही. ती प्रकृती चांगली असल्यास, ती राहण्याकरता वैद्यकीय उपचार करतात, पण बाहेर पडावयाचे असेल तर औषधोपचार करूनही ते बाहेर पडतातच नां? मग नाराज जे होते, ते कोण होते?

ज्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या ठिकाणी काही कळणार नाही. ज्याची प्रकृती सतशुद्ध आहे, त्यानेच हे ओळखले. सद्गुरु शिवाय कोणतीही हालचाल होत नाही. त्यांच्या कृपेशिवाय कोणीही हालचाल करू शकत नाही. हे समजले, मग राहिले काय? होते काय? एवढी गती जर सेवेकर्‍याला असेल तरच समजेल.©️

You cannot copy content of this page