Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

जे नामाने होते ते तपश्चर्येने होत नाही ©️

जे नामाने होते ते तपश्चर्येने होत नाही ©️

गंगा : मी सर्वस्व निरूपण देते. मी अन पार्वती दोघी बहिणी. तरी सता, पार्वतीने तपश्चर्या केली. अघोरांचे नामस्मरण केले. सता आपण निवेदन घेत आहात अन मी पूर्णत्व निवेदन देत आहे. स्वयंभू बरोबर कर्तव्य करणे माझे कर्तव्य! पण सता पार्वतीने अघोर तपश्चर्या केली. स्थितीप्रमाणे मी मोठी अन ती लहान होती. लहानांचे मनोगत पूर्ण करणे हे मोठ्यांचे कर्तव्य आहे. तिची पूर्णत्व इच्छा होती स्वयंभू तिचे पती व्हावेत. मी स्वयंभूना प्रणव दिले असते, तर मान्य केले नसते. महान हट्टी ज्योत आहे. म्हणूनच त्या अवधित मी प्रणव दिले आपण तिची इच्छा पूर्ण करणे. ज्यावेळी स्वयंभूंना आठवण येईल त्यावेळी मी तिथे येईन.

विष प्राशनानंतर जी स्थिती झाली त्यावेळी मी तेथे गेलेच ना! कर्तव्य केले अन आपल्या स्थानात आले. ती पार्वतीच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून! जे नामाने होते ते तपश्चर्येने होत नाही. सता पार्वतीस मी काही प्रणव दिले होते. पार्वती तू जे कर्तव्य करतेस ते योग्य नाही. या भूतलावर अनेक अवतार कार्य झाली. प्रत्येक अवताराचा आपण मनोमन कस घेतला. सता मजला कल्पना आहे जे संयमाने मिळते ते हट्टाने केव्हाही मिळत नाही.©️

You cannot copy content of this page