Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

जपतप खटपट केलीस काही…©️

जपतप खटपट केलीस काही…©️

श्री समर्थ मालिक – जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य ||

ज्ञान म्हणजेच प्रकाश !

संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून नाही. संत आहेत काय? टाळ वाजून किती चालले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप? जप कोणाचे? प्रकाश कोणाचा? याची गती आहे काय? किर्ती, जप, तप करून तरी मिळू शकले आहे काय? पहावयास गेले,‌ घ्यावयास गेले तरी घेता येत नाही. अशाच काही संतांनी घेतले, ते घेऊन गेले.

खटपट, खटाटोप मानवाचा ! खटाटोप संत नाही करत. अन् कराल तर मुक्ती मोक्षाला जाल काय? हे करत आहे, ते करत आहे असे काही मानव आहेत. या दरबारामध्ये सेवेकरी पण आहेत. करून घेणारे कोण आहेत? असे तत्व जोपर्यंत अशा मानवाला कळले नाही, तोपर्यंत जप तपाचा काही उपयोग नाही. विशेष ! आसनाच्या सेवेकऱ्यांना तरी जप तप कळले आहे काय? कसले ज्ञान पाहिजे? मानवाने मानवता ओळखली नाही तर पुढे काय? ज्याला अखंड नाम पाजले आहे, अन् पुढे काय? असे हे तत्व आहे. त्याच नामाचा जप अन् तप अन् त्याचीच खटपट तन्मयतेणे करणे.

लिनता, नम्रता आणि शांती यांचा त्रिवेणी संगम हेच मोठे ज्ञान आहे. ज्ञानाचा प्रकाश आहे. दोघेही सेवेकरी आहेत. सेवेकऱ्यास ज्ञानाप्रमाणे कुठे घालवायचे व ठेवावयाचे, त्याचे ज्ञान पाहिजे आहे अशी सेवेकर्‍यांनी अपेक्षा करू नये. कोण देतो अन् कोण घेतो ? ज्यांना अखंड तत्व मिळाले आहे, त्यांचे आदेश, संदेश मानले आहेत काय? ©️

You cannot copy content of this page