Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

गुरु बंधूत्वाचे नाते कसे असावे? ©️

गुरु बंधूत्वाचे नाते कसे असावे? ©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरू ज्ञान देतात. ज्ञान सर्वांना दिलेले आहे, बहाल केलेले आहे. ते जतन करून, त्याची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु ते सांभाळता येत नाही, त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. तरी सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे.

मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? मायेच्या रहित कोणीही नाही, तरी सुद्धा सेवेकऱ्यांनी मोह मायेच्या अधीन जाता कामा नये. आपल्या सद्गुरुंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहिल, तर सत् त्याच्यापासून दूर राहणार नाही.

“सेवेकऱ्याने माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् मी काय केले पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार केला पाहिजे. भंडार भरलेला आहे, पण लुटणारा पाहिजे.” तसेच “प्रेम सूत्र दोरी अशी बांधिली पाहिजे की एकाच जीवात, एकाच रज्जूत आपणांस डुंबून जाता आले पाहिजे. हेवेदावे, मनाचा कलुषितपणा, कुणाही गुरु बंधू भगिनींना नाराज न करणे हे आपण अंगिकारले पाहिजे. अशीच मनाची ठेवण प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवली पाहिजे.”

येथून पुढे कुणीही कोणाची मनें दुखवू नका. एकमेकांशी वागताना, एकमेकांशी बोलताना आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो ह्याचे भान ठेवूनच आपली वाटचाल ठेवावी. आश्रमात किंवा दरबारात असताना स्थानाचे भान राखूनच आपली कृती ठेवावी.

गुरु बंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे याचे सगळ्यांनी भान ठेवावयास हवे आणि त्या प्रमाणे वागावयास हवे.©️

You cannot copy content of this page