श्री समर्थ मालिक – प्रथम चूक करावयाची आणि नंतर क्षमा मागवयाची, क्षमा करा, क्षमा करा. त्या क्षमेला अंतही नाही आणि पारही नाही. ज्या दिनाला शरण गेलात, त्याचे आदेश संदेश पाळणे हे सेवेकर्याचे कर्तव्य आहे की नाही? एक दोन अशा कितीतरी चुका आहेत. सर्वस्व क्षमेचाच पसारा मांडलेला आहे. म्हणजे तत्त्वात ते रममाण, लिन झालेत का? त्यांनी तत्व ओळखले आहे का? सर्वस्व मनाचा खेळ चाललेला आहे असे म्हणावे कां?
सानिध्यात दोन-तीन ज्योती आलेल्या आहेत, एकही सुधारत नाही. हे सर्वस्व मालिक करून घेतात असेही काही सेवेकरी म्हणतात. जी ज्योत ज्या दिनाला शरण आहे, त्यांच्या आदेशाशिवाय आत येऊ शकते का? अनेक सेवेकरी असे आहेत की त्या दिनाचा आदेश मानत नाहीत. ज्यावेळेला ते सांगतात, ते ऐकून घेतात. पण केव्हा? हे सांगता येत नाही. सेवेकर्यांनी आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. (समाप्त) ©️
