Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

आपणच जबाबदार …!©️

आपणच जबाबदार …!©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी दिलेल्या ज्ञानात तल्लीन असतात काय? ज्ञान बहाल केलेले आहे. त्याचा उजाळा करू लागला तर वेळ प्रसंग येथील तेव्हा स्वतः सेवेकरी सत कृतिमान होऊन दूर हटवू शकेल. सेवेकरी हा शंकेत आहे कि शंकेच्या रहित आहे? म्हणजे अजून त्यांनी सद्गुरु व सत ओळखले असे म्हणावे की नाही? तुमच्या मायेसाठी, सुखदुःखांसाठी सत् आहे, पण भोगत्व कोणी भोगायचे? याच्यातून पार पडणे भाग आहे.

आसनाच्या सानिध्यात कोणी कोणाला हसणे यथायोग्य स्थिती आहे कां ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. मग जे ज्ञान दिले, त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या तऱ्हेने घेतला आहे का? ज्ञान, उपयोग व जपणूक ठेवली आहे काय? पालन चांगल्या तऱ्हेने का केले नाही? सानिध्यात, कर्मसंचितामध्ये ज्ञान जपणूक करता येत नाही, नाते श्रेष्ठ व पवित्र राखू शकले नाहीत मग माझा नाईलाज आहे. आसना सानिध्यात असे वागावे, असे राहावे हे प्रत्येकाने समजले पाहिजे. ह्या स्थानाचे भान राखून, औचित्य राखून, महात्म्य राखून, स्थानात धीरगंभीरपणे, शांत चित्ताने राहावयास पाहिजे, नाहीतर ज्याचा तोच जबाबदार, ज्याचा तोच प्रारब्ध कर्ता. आपले संचित आपणच घडवायचे आणि आपणच भोगायचे. आपणास यातून सोडविण्यास कुणीही येणार नाही हे लक्षात ठेवा. ©️

You cannot copy content of this page