Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अनुग्रह…©️

अनुग्रह…©️

श्री समर्थ मालिक – अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे त्याचे म्हणजे भक्ताचे कर्मसंचित दूर सारून सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती ठाम कृती कितपत आहे हे पहावयाचे असते.

ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत गतीत राहिले पाहिजे. सेवेकर्‍यांना तसेच महान महान तत्वांना, ऋषीमुनींना सुद्धा अनुग्रहाची गती आहे.

आदेश सुटल्यानंतर अनुग्रह, अनुग्रह दिल्यानंतर ॐ काराचे बीजारोपण याचे प्रथम निवेदन दिले जाते अन् नंतर तो सेवेकरी बनतो त्याच सेवेकऱ्याची पुढे सद्गुरु बनण्याची तयारी असते.

अखंड तत्व म्हणजे सद्गुरु – जे आसनावर आरुढ आहेत ते ! एकमेकांच्या हाताला धरून जावयाचे, गती घ्यावयाची कि मी कसा आहे? त्याचे वर्णन नको. सद्गुरु म्हणजे काय?

मानवांना मानवाप्रमाणे सांगावयास पाहिजे. कारण काही जुने अनुग्रहित सेवेकरी आहेत. प्रथम अणूचे वळण लागावयास पाहिजे. नंतर अणूच्याही पलीकडे जावयाचे आहे. पण धीर धरा. आपण सर्वस्व एकच आहोत असे सेवेकरी का म्हणत नाहीत? मला अनुग्रह झाला म्हणजे सेवेकरी हुरळतो. आनंदीत होतो. तर जे हुरळत नाही, आनंदीत होत नाहीत असे ते तत्व आहे. सर्व ठिकाणी भरूनही उरले आहे. ज्यांना अनुग्रह झाला, त्यांना माहित आहे. बाकीच्यांना कर्मसंचिता प्रमाणे मिळणार आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page