श्री भगवान महाराज यांची अमृतवाणी –
रामदास स्वामींनी म्हटले आहे, “वाजे पाऊल आपुले। म्हणे मागोती कोण आले ।।”
जिथे शंकराचे स्थान तेथे पिशाच्च तऱ्हा असणार पण जिथे श्रीहरीचे स्थान तिथे पिशाच्च तऱ्हा वाऱ्यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ तरी तो भक्त आहे. सगळे गण कसे? तर महेशासारखे. त्यांची उपासना कशी? तर “ॐ नमः शिवाय !” पण जरी महेशाचे गण असले तरी सताला आदर देतात.
आपणास कल्पना आहे, समंधाने आपल्या ज्योतीला त्रास देऊन आपल्या ज्योतीला हैराण केले आहे. तेव्हा आम्ही देखील ठरविले या समंधाला हैराण करून नाश करावयाचा. मग पितामहांना सांगून महेशाकडे एका भैरवाची मागणी केली. आता तुम्ही सांगा, भैरव असून तो आसनासमोर कसा काय नतमस्तक झाला? अन आम्हालाच विचारता झाला, काय संदेश आहेत?
आता हे कसे काय? लक्षात घ्या त्रिगुण सताला मानतात अन त्यांचे लष्कर देखील सताला मानते. तुम्ही पाहता, महान महान दैवते देखील सताला मानतात. सध्याच्या युगात कोणालाही सतभक्ती नको, कारण सत भक्ति कशी आहे? तर शांत !आज ही जगात चालली आहे ती भक्ति नव्हे. भक्ति फार वेगळी आहे…©️
