Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

अन एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले? एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने – पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होऊन गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहोचू …

श्री भगवान महाराज यांची प्रवचने – पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान- प्रदानतेची तऱ्हा साध्य …

पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची तऱ्हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण …

पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होते? तर ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या …

मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना …

दरबारची सुरुवात कशी झाली…. प्रत्यक्ष सद्गुरु मुखातील प्रणव !!! अनंतांच्या संदेशानुसार ॐकारांनी पंचवीस अवतार कार्य नटवली. परंतु ॐकारांच्या पाठीमागे अनंत होते. सर्व …

अनंतांनी संदेश दिले, आम्हाला संदेश मिळाले, पूर्वी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की हे अनंतांचे संदेश आहेत. प्रथमावधित गुरुदेव वशिष्ठ देखील प्रगट …

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य …

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

माझ्यातच सामावून जा…©️

माझ्यातच सामावून जा…©️

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने –

पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होऊन गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. लक्षात ठेवा भक्तीमध्ये भेदभाव नाही, कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता महान महान ऋषीमुनी होऊन गेले, पण प्रत्येक जण आपापल्या पायरीप्रमाणे राहणार! संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे.

आजचे युग हे कलियुग आहे येणेच संशय युग आहे. मन चलबिचल होते, द्विधा होते. लक्षात घ्या तापते ते आपले मन.आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही घेणेदेणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत येणेच सद्गुरु ! आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी! लक्षात ठेवा शांत राहिल्यानंतर तुम्ही कधीही अनंतांपासून दूर जाणार नाही.

पाचवा प्रणववेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी येणे, सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले,”तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्या चरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्या वेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले? ©️

You cannot copy content of this page