मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना मार्गदर्शन करता, अडलेल्यांना संकटातून सोडविता, तुमच्याजवळ एवढे ज्ञान आहे, तुमच्याजवळ इतकी शक्ती आहे, मग हे सर्व तुम्ही लपवून का ठेवता?” आता तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा. अन हे सर्व करण्यासाठी माझी खोली दिली पण मूळ मला इथे आणले कोणी तर भगवान काटे! सर्व व्यापातून मुक्त होऊन तो भक्ती मार्गाला लागला. नंतर आम्ही नोकरीतून निवृत्त झालो अन हेच सांभाळू लागलो. पण तुम्हीच सांगा सुरुवातीला कोणाला तरी कल्पना होती का की या आसनाची व्याप्ती किती वाढेल? सुरुवातीला इथे आल्यानंतर इतके चमत्कार सुरू झाले की विचारता सोय नाही. हे आसन अगदी गाळातून वर आले आहे. आम्ही प्रवचन करण्यास सुरुवात केली की पिशाच्च घुमण्यास सुरुवात होत असे अन त्यांचा नाश करण्यातच वेळ जात असे. असे हे सर्वस्वी चमत्कार अनंतांनी घडविले. त्यांनी या शक्तीची जाण करून दिली. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानांतर होऊन शेवटी पांडू बुवांच्या खोलीत स्थिरावलो. (अनंतांना काही कर्तव्य करून घ्यायचे होते म्हणून त्यांनी आमची निर्मिती केली)अन इतर मानवांना अन मानवांकरवी हे सर्वस्व उजेडात आणले. अशा तऱ्हेने या स्थानाची निर्मिती झाली…©️
मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना …
