श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी –
कैचा आला पांडुरंग तेथे । आपल्याला शुभ्र प्रकाश पाहिजे. त्यासाठी नामस्मरण करा. मन संपूर्ण सतमय करा.
लक्षात घ्या ! मन सतमय कसे होईल? संपूर्ण अर्पण केल्याखेरीज मन सतमय होणे शक्य नाही. म्हणून आम्ही आसनावरून सदोदित सांगत असतो, सेवेकऱ्यांनो! मन सतमय करा. काही ज्योती थोड्या अवधीपुरता मन सतमय करतात अन पुन्हा माया बाजारात अडकल्यानंतर सतापासून लांब जातात. मन सतमय करताना आशीपाशी बघत बसू नका.
मन सतमय करण्याची तुमची प्रवृत्ती असते हे आम्ही मानतो. पण त्या प्रकृतीचा देखील कस घेतला जातो. जो सतमय बनण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातच आजूबाजूला मोहमाया पसरवली जाते. खरोखरीचा भक्त असेल, तर तो म्हणतो मला एकच माहिती आहे, माझे सत हेच खरे आहे, अन असाच भक्त टिकतो. पण बाकीचे दूरावतात. लक्षात घ्या आपल्याबरोबर काय जाणार? सत वा असत कृती! सत असेल तर सानिध्य देतील पण असत असेल तर सानिध्य देणार नाहीत…©️
