Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे, ज्याच्या ठिकाणी अनंतांचा वास आहे, त्या ठिकाणी अष्टसिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ॐकारांचे स्थान आहे, त्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी संदेश दिले,”लाघव करण्यासाठी चैतन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या चैतन्याला त्यांनीच निर्माण …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार …

अन एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले? एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने – पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होऊन गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहोचू …

श्री भगवान महाराज यांची प्रवचने – पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान- प्रदानतेची तऱ्हा साध्य …

पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची तऱ्हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण …

पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होते? तर ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या …

मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना …

दरबारची सुरुवात कशी झाली…. प्रत्यक्ष सद्गुरु मुखातील प्रणव !!! अनंतांच्या संदेशानुसार ॐकारांनी पंचवीस अवतार कार्य नटवली. परंतु ॐकारांच्या पाठीमागे अनंत होते. सर्व …

मन स्वच्छ कसे होईल?…©️

मन स्वच्छ कसे होईल?…©️

आमचे संदेशच असे आहेत,”सन्मार्गाने चल, नितिमत्तेने चल, पवित्र आचरण ठेव म्हणजेच तुला मला डोळे भरून पाहता येईल.” पवित्र आचरण नसेल तर तू कसा बरे मला पाहू शकशील?

मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो. पण सतत नामस्मरणाच्या गतीने राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा का मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले मग वेगळेपण शिल्लक राहत नाही.

भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, “यदात्मा दृढ निश्चयी । मे भक्त: समप्रिय: ।। असा दृढनिश्चयी भक्त असेल त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात, अन पाचवा प्रणववेदही लगेच प्रगट होतो. हे जे स्थान आहे ते सत पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे.

ज्यांचा अंत नाही ते अनंत! ते भक्तीचे आगर आहेत. तिथे ऋद्धी-सिद्धी नाही, तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तीचा मार्ग – नामस्मरण! ध्यानधारणा अन मन सत चरणात लिन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा भक्ती केल्याने, ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते…©️

You cannot copy content of this page