Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी संदेश दिले,”लाघव करण्यासाठी चैतन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या चैतन्याला त्यांनीच निर्माण …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार …

अन एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले? एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने – पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होऊन गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहोचू …

श्री भगवान महाराज यांची प्रवचने – पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान- प्रदानतेची तऱ्हा साध्य …

पाचवा प्रणववेद प्रकट झाल्याखेरीस ही जी देवाण घेवाणीची तऱ्हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची तऱ्हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण …

पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होते? तर ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या …

मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना …

दरबारची सुरुवात कशी झाली…. प्रत्यक्ष सद्गुरु मुखातील प्रणव !!! अनंतांच्या संदेशानुसार ॐकारांनी पंचवीस अवतार कार्य नटवली. परंतु ॐकारांच्या पाठीमागे अनंत होते. सर्व …

अनंतांनी संदेश दिले, आम्हाला संदेश मिळाले, पूर्वी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की हे अनंतांचे संदेश आहेत. प्रथमावधित गुरुदेव वशिष्ठ देखील प्रगट …

तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ । ©️

तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ । ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

आपल्या भक्ताने वा सेवेकऱ्याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषीमुनीं बरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते. मग या अशा आसनाच्या सेवेकर्‍यांची पातळी कशी हवी? तर अत्यंत उच्च गतीची हवी. जरी आपण या कलियुगात असलो तरी आपण त्यांच्या सतत सानिध्यात वावरत आहोत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहोत. मग आपल्या विचारांची गती विशाल व उच्च हवी. ही जाण प्रत्येक सेवेकऱ्याने घेणे आवश्यक आहे, अन ही जाण घेऊन त्याप्रमाणे कृतिमान असणे आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत,”आसनाधीस्त! महान महान ऋषीमुनी चकले तेथे या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे?” त्यांनीच पुढे संदेश दिले,

तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ । तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य श्रेष्ठ नसेल तर त्याची किंमत शून्य.

जो मानव आज या आसनावर आहे, त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो, अशा मानवाची जर तुम्ही उपासना केलीत, तर तुमचे अनहीत होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्त्वांना संदेश देत आहे अन इंद्रासारखे तत्व त्या मानवा जवळ क्षमेची याचना करीत आहे मग असा मानव श्रेष्ठ नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठविल का?…©️

You cannot copy content of this page