श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
आज आपण पाहतो मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंचमहाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देऊन कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही .त्रिगुणांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलात कसे प्रवेश करतात हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवांना मन स्थिर होता येत नाही. असे का?
मनाने बाजार गप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते, भक्ताने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या भक्ताने दोन तपे काय तपश्चर्या केली.
आपल्या आसनाजवळ लाघव आहेत, लाघव झाल्यावर, त्रास होऊ लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी तऱ्हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात तेव्हा लाघवाची तऱ्हा ठेवणे क्रमप्राप्त झाले…©️
