श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज –
अनंतांनी संदेश दिले,”लाघव करण्यासाठी चैतन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा.” लक्षात घ्या चैतन्याला त्यांनीच निर्माण केले. आम्हालाही त्यांनीच निर्माण केले, अधिकार देखील त्यांनीच बहाल केले, पण सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण तेच! भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच! जन्माला त्यांनीच पाठवले. तुमचे पालन पोषणही तेच करीत आहेत. दहाही इंद्रियांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत.
असे असून देखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतींना आपली चूक काय झाली हे कळू नये तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे? उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही भक्ताला उपदेश केलात, मग भक्ताने तुमच्याकडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे? आता तुम्हीच सांगा, आसनाची घटक असलेल्या भक्ताने काहीही केले तरी चालेल का? तर नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड येणे शुद्ध शुचिर्भूत ठेवले पाहिजे. सेवेकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरु कधीही शांत बसणार नाहीत पण ते बनवाबनवीचे अश्रू असतील तर लक्षही देणार नाहीत…©️
