ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे, ज्याच्या ठिकाणी अनंतांचा वास आहे, त्या ठिकाणी अष्टसिद्धी देखील वास करू शकतात. ज्या ठिकाणी ॐकारांचे स्थान आहे, त्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथे काय शिल्लक आहे. ज्या ॐकाराच्या ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ती हात जोडून उभ्या असतात असे तत्व जर भक्ताच्या सानिध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्त्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेकऱ्याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा!
पण आपण एवढेच म्हणायचे,”अनंता मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो.” आपण अनुभवले आहे, आपले काही सेवेकरी स्थूल सोडून गेले. त्यांनी आपल्याबरोबर जाताना काय नेले हो? स्वतःचे कवच देखील इथेच सोडून जावे लागले अन शेवट शिल्लक काय राहिले, तर केवळ आठवणी.
आपणास सोडून गेलेली ज्योत तेथे जवळच असते, पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जर पडदा दूर झाला तर तुम्हाला ती पाहता येईल. याकरीता पाचवा प्रणववेद पाहिजे. ज्योत पाहता आली पाहिजे, तिच्याबरोबर बोलणे करता आले पाहिजे. जे भक्त आहेत ते सत सानिध्यात आहेत. सूक्ष्म तऱ्हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत. पण ती भक्तांसाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने, ते या सूक्ष्माच्या नाटकांना घाबरतात…©️
