निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ || सेवेकर्याला अथवा मानवाला एखादी गोष्ट साध्य करावयाची असल्यास ती गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. असाध्य वस्तू जरी वेगळी असली तरी तो प्रयत्न सोडीत नाही.
प्रथम त्याला सरळ मार्ग सापडतो. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. मग त्याला अवघड मार्ग लागतो. महान पर्वत, काटे कुटे, जंगल, झाडी अशा मार्गातून प्रवेश करीत निघाला तरी त्याला त्याचे दुःख वाटत नाही. कारण त्याला महान गोष्ट प्राप्त करून घ्यायची असते. काही झाला तरी तो मार्ग भूलत नाही. तदनंतर त्याला ती महान गोष्ट प्राप्त झाल्यानंतर समाधान वाटते. मग म्हणतो मी प्राप्त करून घेतली की नाही?
अशी त्याला ग ची पीडा होते. अहंकार निर्माण होतो. त्याप्रमाणे सत् भक्तीसाठी आपण त्या भक्तीच्या अनुसंधनाने मिळालेला सत् भक्तीचा प्रकाश, ती योगीयाची खूण योगीच जाणतो. सत् भक्तीच्या मार्गाने जाऊ लागला, त्याला अनुभव येऊ लागला, अनुभव घेऊन तृप्त झाला, मग तो त्या मार्गाने जाण्याचा स्वीकार करतो. पुढे पुढे गेल्यानंतर अडी अडचणी निर्माण होतात. त्रास होतो. त्रास वाटू लागल्यानंतर अनुभव जरी आला असला तरी त्याचा विसर पडून मार्ग सोडतो का तो? ©️
