सद्गुरु चरणांचा अंत घेतल्यावर मुक्ती शोधण्यासाठी कोठेही जावे लागत नाही. सद्गुरु चरणात लीन झाल्यानंतर तो ब्रह्ममय आनंद मिळतो त्याचे वर्णन करता येणे शक्यच नाही. त्या सद्गुरु चरणांचा आशिर्वाद प्रत्येकाने घ्यावयास पाहिजे. स्वानुभव घेतल्या खेरीज ते कसे आहेत ह्याची जाणीव होणार नाही. त्या अनुभव प्राप्तीसाठी सद्गुरु चरणात लीन होणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
सद्गुरु शोधण्यासाठी…
सद्गुरु हेच तत्व, मी कोण आहे, याची जाणीव करून देऊ शकतील. सद्गुरु पद हेच सर्व श्रेष्ठ आहे. याच्या पलीकडे काहीं नाही.
आतापर्यंत जे झाले, ते सद्गुरु माऊलीच्या कृपेनेच झाले. त्या गुरू माऊलीच्या कृपे शिवाय काहीच करता येत नाही. मी काय सांगतो याचे मुळीच भान नाही. बोलविता धनी वेगळाच आहे. कोण बोलतो याची जाणीव रहात नाही.…
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! म्हणून रात्रभर एखाद्या देवळात भजन म्हणणे, टाळ कुटणे, जागरण करणे अशाने ईश्वर मिळत नाही.
सद्गुरु नामस्मरणात आणि दर्शनात शांत चित्ताने, त्याच तत्वात लय होवून, मी कोणीही नाही, करणारे, करविणारे, करायला लावणारे सद्गुरूच आहेत असे म्हटले, म्हणजे त्या दयाघन माऊलीला काळजी पडते. त्या व्यतिरिक्त चारही देहाचा उद्धार होणे…
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! तेणे मुक्ती चारी साधियेल्या !!
मानवाला चार अंगे आहेत - स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ! या चारही देहातून तो उद्धार करू शकतो. केव्हा? तर ज्या ठिकाणी शरण जायचे, त्या ठिकाणी तो पूर्णत्व शुद्ध पाहिजे. द्वैत भावना, संशय, कल्पनारहित जो असेल तोच सत् पाहू शकेल, इतरांस…
श्री समर्थ रामदास स्वामी -
हरिहर ब्रह्मादिक | नाश पावती सकळीक ||
सर्वदा अविनाशी एक | सद्गुरु पद ||
ह्या परम श्रेष्ठ पदाचा महिमा माझ्या सारख्या यत् किंचित पामराने कोठवर वर्णन करावा? अविनाशी पद काय आहे? त्याचा कधीही विनाश होत नाही. कोणी करणारा नाही. करविता नाही. केलेला नाही. अशा परम पदाचा महिमा माझ्या सारख्या…