Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

भक्ती……©️

भक्ती……©️

देव मुर्तीत नाही. तो हृदयात आहे. तो पाहण्यासाठी, त्याचा ठाव घेण्यासाठी अंत:करणाची शुद्धता हीच खरी भक्ती ! अशा तऱ्हेने भक्ती युक्त अंत:करणाने लुब्ध झाला त्याला पांडुरंग दूर नाही. तर तो जवळ आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने भक्तियुक्त अंत:करणाने त्याच्या जवळ जावयास हवे. असे भक्तीचे रुप आहे. त्याला पहण्यासाठी आपल्या ठिकाणी लीन असावे लागते. सर्वस्व पणाला लावतो. परंतु काहीं वेळेला दर्शन होत नाही. ज्या तऱ्हेचा भक्त त्याच तऱ्हेचे दर्शन ! अशा प्रकारचे भक्तीचे स्वरूप आहे.

ग्रंथ पठणाने, उपास तापासणे, योग – यागाने, दर्शन (होणार) नाही. एकच नामस्मरण ! शुद्ध अंत:करणाने ज्याने दिले, त्या नामातच अखंड राहावे. हीच खरी भक्ती होय. शुद्ध साधी सोपी आहे. त्याला बंधन नाही, स्वरूप नाही, रुप नाही.

ज्या ठिकाणी सदगुरू दर्शन, त्याच ठिकाणी पंढरपूर आहे.

संतांनी वळण लावले मान्य आहे. त्यांना ज्या तऱ्हेचा अनुभव, त्याच तऱ्हेची प्रत्यक्ष कृती होती.

प्रत्येक मानवात अनुभव नाही. त्यामुळे कोणत्या तऱ्हेने जावयाचे ह्याचा अनुभव नाही. संतांनी केले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जे अशा तऱ्हेने पंढरपूरला गेले, त्यांना दर्शन झाले आहे. असे फारच थोडे आहेत. स्वतःचा अनुभव सांगण्यास बंधन नाही. जे संत झाले, त्यांनी सर्व काही उघड केले आहे. दर्शनाचा लाभ हीच मोठी आरती आहे.

खरा पांडुरंग फार निराळा आहे.

ज्या तऱ्हेची सेवा, त्याच तऱ्हेचे दर्शन !

ह्या दरबारची सेवा घडली, हीच अनेक जन्मांची भक्ती होय. हीच खरी सेवा होय.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page