Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

दरबार ! ©️

दरबार ! ©️

प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे. 

एखाद्या सेवेकऱ्याचा अनुभव, आजच्या दर्शनाचे वर्णन, आजपर्यंत जी सेवा केली त्याचे प्रतिक, त्याचे दर्शन, वर्णन तेच प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे. 

प्रत्येक सेवेकऱ्याने, आपल्या सदगुरुंनी सत् पदाच्या आसनावरून जे अखंड नाम दिले आहे, त्याचेच नामस्मरण करने, त्यात निमग्न राहणे. आपले मालिक आपल्या पाठीवर आहेत ही भावना ठाम ठेवल्यास त्यांना पाहता येईल. त्यांचा ठाव घेता येईल. तशी भावना न ठेवल्यास त्यांना पाहता येणार नाही. 

या दरबारची स्थिती फार निराळी आहे. कितीतरी अखंड ज्योती या दरबारात येण्यासाठी तळमळत आहेत. परंतु त्यांच्या कर्मसंचिताप्रमाणे आडपडदे दूर झाल्यानंतर त्यांना तो लाभ मिळणार आहे. काळ समिप आला आहे. उघड होण्याची वेळ आली आहे. ज्यावेळी उघड होईल, त्यावेळी स्थिती फारच निराळी होईल. 

या ठिकाणी अखंड तत्व राबत आहे. सेवा, सेवेकरी, सद्गुरु भक्ती ही अखंड सारवण याचा अर्थ फार खोल, फार निराळा आहे. सेवा कोणत्या तऱ्हेची, किती तऱ्हेने सदगुरू सेवा, कोणत्या कोणत्या तत्वाप्रमाणे तन, मन, धन यांच्या पेक्षाही चौथी सेवा अमूल्य आणि मार्मिक आहे. ती सेवा कोणती? 

जे मनाच्या पलीकडेही जी शक्ति, त्या शक्तीचे अर्पण सदगुरू चरणांवर असल्याशिवाय सेवा रूजू होत नाही. सेवा आणि सदगुरू याचा अर्थ ज्यांना मान्य नाही, तो सेवेकरी नव्हें. 

कोणाला सेवेकरी म्हणायचे? 

सेवा दिली तो सेवेकरी नव्हें ! तन, मन, धन एव्हढेच नव्हे, तर मनाच्या पलीकडचे जे चित्त ते सदगुरू चरणांवर अर्पण करावयाचे असते. असे ज्याने केले, तो सेवेकरी होय. 

हा दरबार साधा नव्हें, दैवतांचा तर नव्हेच नव्हें आणि शक्तीचाही नव्हें अगर त्रिगुणात्मक सुद्धा नव्हें. त्या पलीकडचा हा दरबार आहे. या दरबारात लाघव कोणाचेही चालणार नाहीत. 

सत् बाहेर काढण्यासाठी अहोरात्र हा दरबार धडपडत असतो. सर्वांना दर्शनाची फार तळमळ असते, मग कोणत्याही स्थितीत ते असोत. सर्वांना दर्शनाची तळमळ आहे. ©️

(समाप्त)

You cannot copy content of this page