आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही.
मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा…
ज्ञानाची मूर्ती म्हणजे कोणती मूर्ती? कोणते नांव? असा अविनाशी आत्मा म्हणजे स्वयम् प्रकाश ! त्यालाच पाहिले पाहिजे !
आपल्या शरीर रुपी पिंजऱ्यात कसे आरुढ आहेत याची जाणीव सेवेकऱ्यांनी घ्यावयास पाहिजे. जाणीव घेतल्यानंतर याच मार्गाने ज्योत गेल्यानंतर, पायरीने मग ते मालिक कसे आहेत, त्यांना आकार आहे कां? ते…
(१) मालकांचे बोल – आसनावर असलेले तुलसीपत्र सेवेकऱ्यांशिवाय इतरांना घेण्याचा अधिकार नाही. जे भावी सेवेकरी आहेत, त्यांनी आसनाधिस्ताना विचारुन व त्यांनी परवानगी दिली तरच तुलसी पत्र घेणे.
उदाहरणार्थ - एका घरात दोन ज्योती आहेत – एक अनुग्रहित व एक नाही. ती भावी सेवेकरी मानली जाते. ती ज्योत त्या ज्योतीवर (सेवेकऱ्यावर) अवलंबून असते, अशी ज्योत आसनाधिस्ताना…
स्वाभिमान आणि अभिमान -
स्वाभिमान आणि अभिमान याचा अर्थ एकच आहे. भक्ती करताना स्वाभिमान आणि अभिमान याने पूर्णपणे रहित होऊन भक्ती मार्गास लागणे. त्यानंतरच पुढच्या पायरीची जाणीव होईल.
स्वाभिमान आणि अभिमान या जाळ्यात गुरफटल्या नंतर भक्ती ही काय चीज आहे, याची जाणीव होणे अशक्य आहे. भक्ती करताना या दोन्हीं स्थिती स्वाभिमान आणि अभिमान यांनी पूर्णपणे…
अक्षय मुनी - सद्गुरु कृपेनें २ ते २|| हजार वर्षांपूर्वी ज्याची तहान लागली, ज्याचे चिंतन करीत बसलो, त्या सद्गुरु माऊलींचे अखंड दर्शन व्हावे ही इच्छा आहे. भीमा आणि घोड नदीचा जेथे संगम त्या ठिकाणी आम्ही असतो. आम्ही म्हणाल तर, २००० हजार वर्षांपासून तळमळत होतो. ते दर्शन आज पूर्णत्वाने…
मन आणि माया -
माया म्हणजे काय? कोणी पाहिले आहे काय?
माया म्हणजे स्वयं पद आणि त्या स्वयं पदाचा प्रकाश !! त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश !
त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तो पाहून त्याला भाळतो आणि जे जे दृष्टीस पडेल, ते ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रकाशात अमूल्य…
हा दरबार आदिअंतापासूनचा असा स्वयम् दरबार आहे. हा दरबार, हे ठिकाण सत् आहे. कोणालाही ते असत ठरविता येणार नाही आणि कोणी ठरविलेले देखील नाही, ठरवू शकणार नाही. हा कोणी मानवाने किंवा तत्वाने निर्माण केलेला दरबार नाही.
श्री प्रभू रामचंद्र चौकट मुनींना म्हणतात, "महामुनीश्र्वरा - आसनाधिस्त व आसन काय आहे, याची आपण पूर्ण जाणीव…
*गजेंद्र मोक्ष* या नावासंदर्भातील कथा प्रसिद्ध आहे.
हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ भागवत पुराणातील ८ व्या स्कंधातील हि एक पौराणिक आख्यायिका आहे.
गजेंद्रचा मागील जन्म -
गजेंद्र - त्याच्या मागील जन्मात, इंद्रद्युम्न नावाचा महान राजा होता. जो विष्णू भक्त होता. एके दिवशी, अगस्त्य ऋषी, या राजाला भेटायला येतात. परंतु राजा इंद्रद्युम्न (गजेंद्र), त्याला भेटायला आलेल्या…
श्री प्रभू रामचंद्र म्हणतात, "या दरबारात किती वेळा येणे झाले आहे. महाराष्ट्र भूमी बद्दल पुढे ते म्हणतात, "कोपिष्ट मुनींच्या (विश्वामित्रांच्या) शापाने ग्रासलेली व शापदग्ध झालेली आपली ही भूमी आहे. आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीला मुक्त करण्याचे महान कार्य या दरबारात सुरू झालेले आहे आणि आता ते सफलही होत आहे, हे पाहून आनंद होत आहे. या कार्यामुळे…
समर्थांचे समर्थ फार निराळे आहेत. लाखों समर्थ निर्माण करण्याची त्यांची ताकद आहे. त्यांची शक्ती आम्हाला कशी अजमावता येईल?
ते राम फार निराळे आहेत. तेच समर्थांचे समर्थ होय. या दासाला क्षमत्व असावे. समर्थ कोणाचे समर्थ? हे समजत नाही. या आसनाचे समर्थ फार निराळे आहेत. परंतु फार दयाघन आहेत. त्यांच्या अमोघ शक्तीचे मोजमाप कोण करणार? त्यांचा अंत…
चौकट मुनी - भक्ती करून घेणारे फार निराळे आहेत आणि कशासाठी भक्ती?
जो मानव सत् पाहण्यासाठी तत्पर झाला आहे, तो काहीही होवो, केव्हाही मागे पुढे पाहणार नाही. ज्याची जितकी उत्कंठा झाली असेल, त्याची ती इच्छा सफल होण्यासाठी, त्याला कशाचेही भान रहात नाही आणि ती सफल झाल्यानंतर…
चौकट मुनी - म्हणजेच अगस्त्य किंवा अगस्ती मुनी ! ते म्हणतात, "ज्या अमुल्य क्षणांची मी वाट पहात होतो, तो क्षण आज मला लाभला. धन्य झालो."
दोन हजार वर्षांपूर्वी कुपीच्या डोंगराच्या पायथ्याशी, एक गुहा आहे, त्या ठिकाणी एका वृक्षाखाली ध्यानस्थ असताना, सद्गुरु माऊलींचे एकदा दर्शन लाभले. त्यावेळेला दिलेल्या आदेशाला आज पूर्तता आली.
(वालावल व चेंदवण या…