गुरू कोणाला म्हणावे? कसा असावा?
अनेक अनेक (गुरू) होऊन गेलेत. होणार आहेत. मानव ज्योत आपणाला सत् मार्ग, सत् आचरण, सत् बनविण्याच्या मार्गाला आहे. तेच सत् गुरु असे कोण? याच्या शोधाची प्रत्येक सेवेकऱ्याची धडफड आहे.
सत् गुरु कसे? …
सेवेकरी ज्यावेळेला शरण जातो, तो कोणाला शरण जातो? जे त्रिभुवन व्याप्त असून, अलिप्त आहेत, तेच आसनाधिस्त असून, त्यांनाच सेवेकरी शरण जातो. तेच ठिकाण परम शांतीचे माहेरघर, परमधाम, आश्रयस्थान, सर्व सुखांचे परमोच्च निदान आणि त्याच ठिकाणी शांतीही अखंड नांदत असते. तेच मोक्षाचे ठिकाण होय. तोच मोक्ष होय.
मग आसनाधिस्तानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करीत करीत मन एकदम शुद्ध…
गुरू म्हणून शरण आलात, मग ती सद्गुरु माऊली कशीही असो, आसनावर बसलेली आहे, त्यांना जे पूज्य मानतील त्याच सेवेकऱ्याना त्यांची ओळख पटेल आणि जर जर का तो तेथे चोखाळा करीत राहिला, तर मात्र त्याचाच चोखाळा होईल.
ज्या मानवाला, तू मानव आहेस की, कोण आहेस याची ओळख ज्या…
मानवाची अशी इच्छा आहे की आम्हीं शरण आहोत.
कशाकरीता शरण आहोत? कोणाला शरण आहोत?
कोणाला ईश्र्वर पहाण्याची इच्छा असते, तर कोणाला धनसंपदा मिळविण्याची इच्छा असते, कोणाला संपत्ती मिळविण्याचा उद्देश असतो, अशी प्रत्येकाचीच इच्छा वेगवेगळी असते.
कोण म्हणतं मला मुल…
ज्या भोजनाची मला आवड आहे, त्या भोजनाने माझी तृप्ती झाल्यानंतर येथपर्यंत येऊ शकतात. ते नाम, ते भोजन कोणत्या तऱ्हेने व्हायला पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करून, जो का या एकातच रमला, तोच परम पदी पोहचू शकला. नाहीतर *नामस्मरण* करतो, परंतु मनाची भावना भलतीकडे असते नाम चालू असून देखील मन कशात तरी गुंतलेले आहे, तर काय उपयोग?
आजचा…
चौकट मुनी – गजेंद्राच्या भक्तीसाठी लक्ष्मी नारायण, या ठिकाणी माऊलीच्या स्थानाजवळ स्थीर झाले. त्या ठिकाणी जे तळे आहे, तेथे नारायणाचा अंश प्रत्यक्ष प्रगट आहे.
पूर्वी जी तळ्यात ज्योत खेचली जात होती, आता ती खेचली जाणार नाही. आपणांस रामनवमीच्या दिवशी स्थापना करण्यास हरकत नाही. …
हे आसन तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग सर्व ठिकाणी आहे. येथून सुटलेले आदेश कोठे जातात? कोठे घुमतात? याचा ज्याला अनुभव घ्यावयाचा असेल, त्याने आपल्या शक्तीने प्रयत्न करावा. कोणत्या कारणाने आपण या दरबारात आलो याचा प्रत्येकाने शोध लावावा.
आसनाधिस्त कोण आहेत? कोणत्या ठिकाणीं आहेत? कसे आहेत? याचा…
आसन म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हे. आसनाला अधिकार काय आहेत? कोणी दिधले? कशाकरीता दिले? याचा सेवेकऱ्यानी अंत लावला आहे का? या दरबारातील प्रत्येक ज्योत प्रकाशित आहे. फक्त संचिताप्रमाणे, पूर्व कर्माप्रमाणे वाणीने व ओघाने फळ प्राप्त झाले आहे.
या दरबारात, सानिध्यात येण्याला पूर्व जन्मिचा ठेवा लागतो. प्रत्येक अणु रेणू चत्वार खाणीत ह्या दरबाराची व्याप्ती आहे. सर्व…
अक्षय मुनी
मायेच्या जाळ्यात गुरफटणाऱ्याला, अखंड दर्शन नाही. ते जाळे तोडून गेल्यानंतरच दर्शनाचा लाभ मिळेल.
माया ही अमोल चीज आहे. जो मायावी जाळ्यात पूर्णपणे जखडून गेला, तो त्यातून केव्हाही सुटणे शक्य नाही. जो हे जाळे तोडून सद्गुरु शोधासाठी धावला, त्याला सद्गुरु दूर नाहीत.
मायेचा अंत, मायेचा ठाव, कुठपर्यंत आहे, हे ज्याला कळले तोच सद्गुरुंचा ठाव…
मानव षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटला असला तरी ते तोडण्याचे सामर्थ्य आपल्या सद्गुरुं मध्ये आहे. त्यांचे बोल झेलणे हीच सहज स्थिती आहे. त्याचा ठेवा करून ठेवता ठेवता तो सदगुरुं जवळ येतो. मग सत् भक्ती बीजारोपण नंतर सद्गुरूंची ओळख, नंतर सत् शोधण्यासाठी आपल्या सद्गुरुंचा आदेश. बोल साधा, पण सहज गतीने निघालेला असतो. सद्गुरूंच्या मनात आल्यानंतर ते कोणालाही, केव्हाही…
ज्याला आदेश पटले, तो सर्वस्व आपल्या सद्गुरु चरणांवर अर्पण करतो, त्यालाच आदेशाची किंमत व ओळख असते. आदेशाची प्रत्येक सेवेकरी वाट पाहत असतात. पुढच्या दरबारात आदेशावर आणखी प्रवचन होईल.
“आदेश” म्हटल्या नंतर त्याचा ध्वनी दुंदुभी त्रिभुवना सहित २१ स्वर्ग, व सप्त पाताळ या ठिकाणी घुमतो. हे सेवेकऱ्याना माहित नाही काय? ओळख करून घेतली असे म्हटले तर…
आदेशावर आतापर्यंत तीन दरबारात प्रवचन झाले. एवढे असूनही दरबाराचे व आदेशाचे महत्व राखले जात नाही याबद्दल खेद वाटतो. आदेश म्हटल्यानंतर आदेश कोठून आला? त्याची जाणीव घेण्यासाठी तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग, चत्वार खाणी यांच्यातील प्रत्येक ज्योत आदेश कोठून आला, त्याची जाणीव घेते. आदेश हा ध्वनी उमटल्यानंतर, घुमल्यानंतर ज्या समाधीत ज्योती आहेत, त्या खडबडून जाग्या…