गोवर्धन ऋषी -
जो तेजोमय चैतन्याचा गाभा, तो आज पूर्णत्वाने मिळाला. आतापर्यंतची कृती कर्तव्य, त्याचे फळ प्रत्यक्ष अनुभवायास मिळाले. ध्यानस्थ स्थितीत संकट ओढवले असताना, त्याची यत्किंचितही जाणीव न देता, त्याच स्थितीत ठेवले.
कोणते असे तत्व श्रेष्ठ होते की, त्या तत्वासाठी अहोरात्र टाहो फोडीत होतो, ते मिळाले नाही. परंतु आज प्रत्यक्षात मिळाले.
सद्गुरु नाम आणि ध्यान…
स्वाभिमान आणि अभिमान - स्वाभिमान आणि अभिमान याचा अर्थ एकच आहे. भक्ती करताना स्वाभिमान आणि अभिमान याने पूर्णपणे रहित होऊन भक्ती मार्गास लागणे. त्यानंतरच पुढच्या पायरीची जाणीव होईल. स्वाभिमान आणि अभिमान या जाळ्यात गुरफटल्या नंतर भक्ती ही काय चीज आहे, याची जाणीव होणे अशक्य आहे. भक्ती करताना…
प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे.
देव मुर्तीत नाही. तो हृदयात आहे. तो पाहण्यासाठी, त्याचा ठाव घेण्यासाठी अंत:करणाची शुद्धता हीच खरी भक्ती ! अशा तऱ्हेने भक्ती युक्त अंत:करणाने लुब्ध झाला त्याला पांडुरंग दूर नाही. तर तो जवळ आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने भक्तियुक्त अंत:करणाने त्याच्या जवळ जावयास हवे. असे भक्तीचे रुप आहे. त्याला पहण्यासाठी…
भक्ती किती साधीसुधी गोष्ट आहे. भक्तिमार्ग हा राजमार्ग आहे. हा राजमार्ग कोणाप्रत जावयाचा आहे, याचा शोध प्रत्येक भक्ताने करावयाचा आहे. या राजमार्गाच्या योगानें मनाची भूमी शुद्ध व सात्विक होते आणि संतांचे, सत्याचे व सात्विकतेचे वळण मनाच्या ठिकाणीं निर्माण होते. ज्यावेळी शुद्घ सात्विकता निर्माण होते, त्यावेळी आपले परमेश्वर आपल्या प्रबळ इच्छा व भावना तृप्त करतात.
कोणता…
आपणाला ज्ञान केव्हां मिळत नाही?
आपणाला ज्ञान नेहमी मिळते. काहीना ज्ञान आहे. काहीना गती माहिती नाही. ते ज्ञान आता देत आहे. पूर्णपणे पाहून घ्या. काही कसर करू नका. आता, ज्ञान नाही, त्यांना ज्ञान देण्यात येत आहे. दोन्ही हातांनी आपणाला ज्ञान देण्यात येईल. पाहणारे ते आपण पाहू शकता. …
नंतर ज्या पदाला शरण आहात, तेथे पूर्ण लक्ष देवून, तेथून ज्या नामाची जाणीव, त्यात गुंग होणे, यालाच म्हटले आहे, उपवास !
हल्लीचे मानव तसे नाहीत. सर्व ठिकाणी एकच माऊली वास करते. पण प्रकृतीचे ढंग केव्हाही जाऊ शकणार नाहीत. प्रकृतीच्या अंगाने पाहुर लागल्यास वितंड वाद होऊ लागतात आणि संता संतात सुद्धा पुढें बोलणे नको. माझी इच्छा…
एकांत म्हणजे एकाचाच अंत घेणे येणे नाम एकांत !
एकादशी म्हणजे दश इंद्रिये एकात मिलन करणे. एकचित्त समर्थांचे चरणात होणे. दश इंद्रिये अकराव्यात मिलन करणे येणे नाम एकादशी !
आता दश इंद्रिये एकात मिलन होतील कशी? …
https://www.facebook.com/groups/1501273460034228/permalink/2607107676117462/
आपले माता - पिता हे ही त्याप्रमाणे आहेत. परंतु गुरू पेक्षा माता -पिता श्रेष्ठ म्हणावे तर आयुष्याचे कोटकल्याण करणारे फक्त गुरूच आहेत. माता पित्याची पायरी सद्गुरुंच्या खालची आहे. हे सत्य आहे.
परंतु गुरू सुद्धा त्या पातळीचे पाहिजेत. आपण प्रथम गुरु करतांना, प्रथम विचार केला पाहिजे. या मार्गाने कितपत पोहोचू. कितपत नाही. याचा विचार आपण केला…
सद्गुरु म्हणजे काय?
सद्गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर मानले पाहिजे. आयुष्याचे कल्याण करणारे तेच आहेत. प्रथम गुरु आपण देव मानला पाहिजे. गुरु हे पद फार श्रेष्ठ आहे. गुरुला मुकला तो सर्व आयुष्याला मुकला. प्रथम गुरुभक्ती केल्याने, पुढील मार्ग सोपा आहे.
परंतु प्रथम गुरु कोण? कसा आहे? हे जाणून, त्या ठिकाणी कोण आहे, हे समजावून घेतले पाहिजे.…
होळी - २०२४
मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी, हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. होळीच्या दिवशी होलीका दहन करतात आणि पुरणाचा नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून अग्नि देवतेला नमस्कार केला जातो.
हे पण राक्षसी होलिकेचच दहन असतं. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. हे जरी खरे…