श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, त्याठिकाणी त्याची छाया आहे. मनुष्य नसेल, तर त्याची छाया नाही. तसेच हे त्रिगुण आहेत. त्यांची पण छाया असणारच ! प्रत्येक तत्वाला अधिकार दिलेत. त्याची हेळसांड झाल्यामुळे, त्यांना सुद्धा शासन देण्याचे सामर्थ्य कोणाजवळ तरी…
काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण कोणत्याही स्थितीत शोधा-शोध केली, तर आपणास कळेल की, हे अखंड नाम कोणत्याही ठिकाणी दिले जात नाही.
येथे सांगितले जाते, ते अनुभवातले सांगितले जाते. प्रत्यक्ष सहजासहजी विषय निघाला की त्याच्यावर प्रवचन सुरू होते.…
श्री समर्थ मालिक - कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार नाहीत. जो सेवेकरी येथे ऐकतो व बाहेर गेल्यानंतर विसरतो, त्याला अनेक विवंचना निर्माण होतात व त्यातच तो गुरफटला जातो.
खरोखरच येथील सेवेकऱ्यांजवळ एवढे अखंड तत्व सतत पाठीशी उभे असताना, त्या सेवेकऱ्यांनी हातात…
तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही का? त्यांना ते दिसत होते, पण इतर ज्योतीना त्याचा अनुभव नव्हता. त्यांचा भाव निराळा नव्हता.
तुकोबाला किती त्रास झाला? त्याने भोगले की नाही? मग असे का झाले? सेवेकऱ्यांनी विचार करावा. सर्वांची मते…
पडिले वळण इंद्रिया सकळा………..यांनी असे का म्हटले? स्वतःच्या वरून सांगितले की इतरांवरून सांगितले?
त्यांनी तो स्वतःचा अनुभव सांगितला. जो भक्तीत रममाण झाला, त्याला लबाड, दुश्मन, चांडाळ दिसत नाहीत. पाप पुण्य समजत नाही. तो एकातच रममाण झालेला असतो. म्हणून म्हटले आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा ! पण ते कधी आणि केव्हा?
ते संत रात्रंदिवस…
श्री समर्थ मालिक – पडिले वळण इंद्रिया सकळा | भाव तो निराळा नाही दूजा | इंद्रियाना वळण कसे आणि कोणत्या रितीचे असावे आणि कोणत्या रितीचे नाही हा प्रश्न आहे.
जी ज्योत भक्तीत, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियांचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले आहे?
"पडिले वळण इंद्रिया सकळा" त्याला जिकडे पहावे तिकडे…
Oplus_131072
अलख – ज्या ठिकाणी जागृती तेथेच सत् ! ज्या ठिकाणी नाही, तेथे सांगण्याची जरूरी नाही.
सत् तत्व सर्व ठिकाणी आहे. सत् वलयात प्रगट होते. असत्यामध्ये सत् हे सुशुप्तावस्थेत असते. सत् ते सर्व ठिकाणी भरले आहे.
राजशी ज्योती, त्याही प्रगट आहेत ना? मग त्यांना दानव, अघोरी का म्हणायचे? उत्पत्ती, स्थिती व लय कोणत्या तत्वात…
समर्थ – सेवेकरी ज्यावेळेस अखंड सेवेला पात्र होतो, त्यावेळेला सेवेकरी आणि सद्गुरू तत्व निराळे नाही. गोवर्धन चैतन्यमय होण्याची स्थिती आहे. सर्वस्व चैतन्यमय आहे. अफाट भक्ती आहे. सत् आचरण आहे. त्या युगामध्ये त्यांच्यामुळे फार मोठे कार्य झाले आहे. मात्र जे संचिताप्रमाणे कर्म भोगावयाचे ते भोगू दिले आहे. एवढी महान भक्ती, एवढी महान शक्ती असताना…
अलख – कृती तसे फळ ! झाले ते योग्यच आहे. दोन वेळेला आदेश मान्य केले नाहीत. त्याला गेल्या दरबारात गुप्त आदेश दिले होते. त्याप्रमाणे त्याच्या सांगण्यावरून आदेश दिले होते. त्याने कबुल केले होते की, ज्यावेळेस आटोक्याचे बाहेर जाईल, त्यावेळेला वरूणाला आदेश देऊन आटोक्यात घेईल. आपण केले ते योग्यच केले. त्याच्या कृतीचे फळ त्याला मिळाले. …
चेतना – (ऋषीकन्या) प्रथम मला अभय पाहिजे. एवढे सानिध्य असताना मला माझ्या सद्गुरूंची ओळख झाली नाही, याबद्दल वाईट वाटते. सत् कार्याचा नेहमी उपदेश मिळत असताना, हे दुष्कृत्य माझ्या हातून झाले, फार वाईट वाटते. आत्तापर्यंत माझ्या हातून जे काही झाले, ते सर्व सतच झाले असे मला वाटत होते. ती हरीणी गर्भिणी असल्यामुळे, तिच्यावर माझा फार जीव…
दरबार हा दरबार आहे. आसन हे आसन आहे ! ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी दरबार आहे. त्या ठिकाणी आसन आहे.
जशी संघर्षणे होतात, तसे सताकडून आदेश सुटत असतात. जे खेळ खेळावयाचे ते प्रत्यक्ष सत् खेळत नाही, तर जी लाघवी शक्ती, ती खेळ खेळत असते. काहीही स्थित्यंतरे झाली, उलथा-पालथ झाली तरी सत् ते सतच राहणार…