Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

पांडवांचाच पाठीराखा का झालो? ©️

पांडवांचाच पाठीराखा का झालो? ©️

भक्तीत रममाण होणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. जे भोगत्व आहे, ते कोणासही सुटलेले नाही. भोगत्व नसेल तर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो. फक्त कस घ्यावयाचा असेल, तर तो मीच घेऊ शकतो, इतर कोणीही नाही.

देही जर पंढरी बनली, तर तो बाकी उरला आहे असे होईल का? तर नाही. असा जर तो भक्त झाला, तर माझे लक्ष त्या भक्ताकडे असणारच ! पण, असा होण्याचा सेवेकऱ्याने प्रयत्न केला तर !

आपणाला किती वेळा सांगितले, “कर्तव्य सोडू नका.” भक्ती साधी, सोपी, तितकीच कठीणही आहे. त्यातून निभावून जाणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. माझ्या भक्ताची थोडीशी चाचपणी केली तर त्याला वाटते, आम्ही आपले सेवेकरी मग असे का?

बोलणे सोपे, तशी कृती सोपी आहे का? माझे लक्ष आहे की नाही, याची तुम्हास जाणीव राहणार नाही. पण इतकेच आहे, असूनही नाही. मग मी असूनही नाही असे का? पांडवांशीच मी सहकार्य केले, मग कौरवांचे हृदयी मी नव्हतो का? मग पांडवांचाच पाठीराखा का झालो? हे लक्षात घ्या. ©️

You cannot copy content of this page