Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

कर्तव्य कसे होते, कोण करते….©️

कर्तव्य कसे होते, कोण करते….©️

कासयासी ऐसा माझे माथा ठेवा | भार तुम्ही देवा संतजन |

विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण ||

काय वानराचे अंगी ते शक्ती | उदका तरती वरती शिळा ||

तुका म्हणे करी निमित्यची आड | चेष्टाऊणी जड दावी पुढे ||

प्रथम त्याला कृती करताना काही वाटत नाही. स्थुलात, जड देहात होता, त्या वेळेला सताला त्रास दिला, म्हणजे नाशाला कारणीभूत ज्याचा तोच होतो. त्यापेक्षा तुम्ही एकाच मार्गाने जाल, तर तुमचा तुम्हीच मोक्ष मिळवू शकता. ईश्वरा समान बनू शकता. नाही पेक्षा मन मानेल, मन डोलेल, त्याप्रमाणे डोलू लागलात, तर मात्र फार कठीण आहे, मग विधान कसे होते, तर अशुद्ध होते. नंतर त्या कृतीमुळे संचित वाढते. आपोआप टोले बसतात. मग सताना तो विनवणी करतो.

दृढ विश्वास व एकच तत्व असल्यामुळे शिळा तरल्या गेल्या. होते ते चांगल्या करिता होते. मानवाकडून कृती करून घ्यावयाची असली, तर वाटेल ते करून घेतात. मानव म्हणतो, मी करतो. मी केले हे सत्य आहे की नाही? वानर सैन्य हाताशी असताना, हे कार्य करण्याची आवश्यकता काय? हा मुद्दा बाजूला ठेवा. पण विचित्र विधानाचा क्षय होऊन शुद्ध विधान कसे वाढेल? याच मार्गाने जाणे. जे घडते, ते काहीतरी निमित्त करून करावे लागते. मात्र कर्तव्य कसे होते, कोण करते याची जाणीव मिळणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page