Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

एक तत्त्व नाम ©️

एक तत्त्व नाम ©️

समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, एका तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक मिनीष सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.

शरीर हे जडत्व आहे. तेव्हा जडत्वावर वाटेल ते व्याप, मायावी तऱ्हेचे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, जर झाले, तर, सेवेकऱ्याच्या मनाची जी अस्थिरता, जी अदला बदल होते, ती होऊ न देता स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे. जेवढी होता होईल तेवढी शांती टिकविण्याचा प्रयत्न करणे, तदनंतर त्याचा उपभोग अवश्य मिळेल. हे मात्र, असत नाही, सत्य आहे. त्याप्रमाणे आपापल्या कर्तव्यात, अखंड नामात, मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे.

आपल्या संगतीने काय येणार हे सेवेकऱ्यांना माहित झाले असेलच. संगती जे येईल तेच घेण्याचा प्रयत्न करणे. या जन्मी कमावलेली सत् संपत्ती, तिचा पुढील जन्मी उपभोग घेता येईल. सध्या दुःख वाटते, पण दुःख वाटून न घेता शांत रितीने राहणे, वावरणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे व हे संदेश आहेत.

काही सेवेकऱ्यांची मने हेलकावे खातात. त्यांना इतकेच सांगावयाचे, मनाला हेलकावे खाऊ न देता, नामातच स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे. या घडामोडी अशा चालणारच. जडत्वाला शासन देणे हे त्या जडत्वाच्या कृतीमुळे घडते. सत् कृती असेल तर जडत्वाला त्रास घडणार नाही. असत संचित असेल तर त्याचे त्यालाच भोगावे लागते.

भोगत्व सुटलेले नाही. त्याबद्दल सेवेकऱ्याला दुःख वाटते, पण ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा सेवेकऱ्यांनी विचार करावा. काही सेवेकरी व आसनाधीस्त सुद्धा मला असे म्हणतात, “मालिक तुम्हाला काय? तुम्ही निराकारी आहात.” पण सेवेकर्‍याला जो त्रास होतो, तो जरी मला सोसावयाचा नसेल व मला त्रास नाही हे सत्य आहे, पण सेवेकरी म्हटल्यानंतर आसनाधिस्तांची गार्‍हाणी, चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. सेवेकऱ्यांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. मग यातून कोण सुटलेला आहे का? मग त्यासाठी वाईट वाटणे, चिंता बोलावणे योग्य आहे का? सत्, असत हे दोन्ही समान पात्रतेने ठेऊन, सेवेकरी वाटचाल करील, तर सेवेकऱ्याला सुखदुःखाची विभागणी, वाटप करणार नाही. याच तऱ्हेने सेवेकऱ्याने कर्तव्याचा मार्ग आक्रमण करणे हेच आजचे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page