Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सुत्रधार ! ©️

सुत्रधार ! ©️

सेवेकऱ्यांची प्रकृती भिन्न असेल, तर अभिन्न बनविण्याचा प्रयत्न करा. हे फार मोठे कर्तव्य आहे. मी भिन्न नाही, अभिन्न आहे हे लक्षात ठेवा. म्हणून किंचित मानवाने हे लक्षात घेतले पाहिजे कि प्रकृती आज आहे आणि उद्या नाही. हे मानवाना कळत असताना सुद्धा भिन्नपणे व्यवहार करतात. हे बरे नाही. बनवा बनवी, चकवा चकवी, करू नका. या बोटाची थुंकी त्या बोटावर नाचवू नका. एकाच अखंड मार्गाचा अवलंब करून प्रकृती अभिन्न बनविण्याचा प्रयत्न करा. हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे सेवेकरी वाटचाल करतील अशी अपेक्षा आहे.

सूत्रधारी बाहुली नाचवी तो मीच, हे कबूल करतो. पण बाहुली कुठे नाचवायची, हे मीच जाणतो. सूत्राची दोरी खडबडवितो ती का? कशासाठी? खरोखर भक्त त्या पात्रतेचा असेल, तर सूत्राची दोरीची चलबिचल करण्याची आवश्यकता वाटेल का? भक्त जर इथे तिथे तोंड घालू लागला, तर सूत्राची दोरी ढिल सोडावी लागेल, मग त्याप्रमाणे कर्तव्य! पण जर सेवेकरी त्या ठायी रममाण झाला, तर सूत्राची दोरी नाचविता येणार नाही. म्हणून सर्वस्व लाघवी खेळ करून त्याचे मन ज्या बाजूला जाईल, त्याच बाजूला मी पाठवीतो. का? तर, भावना स्थिर नाही, श्रद्धा ठाम नाही. मनाचे कोड कौतुक त्यालाच करून घ्यावेसे वाटते. म्हणून सेवेकऱ्याने कोणत्या तऱ्हेने वर्तणूक ठेवणे, हे ज्याचे त्याने शोधून काढले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page